मोरया महिला प्रतिष्ठान आयोजित मेकअप सेमिनार उपक्रमास उदंड प्रतिसाद
वडगाव मावळ:
मोरया महिला प्रतिष्ठान ने “जागर स्त्री सौंदर्याचा” या अंतर्गत शहरात प्रथमच आयोजित केलेल्या “भव्य मेकअप सेमिनार” या कार्यक्रमास वडगाव मधील सुमारे अडीच हजार महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभीच अंधश्रद्धेला फाटा देत शहरातील विधवा महिलांना मान देऊन काही विधवा माता, महिला-भगिनींच्या शुभहस्ते सरस्वतीचे पूजन करून या भव्य एकदिवसीय कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार सुनील शेळके, मावळ तालुका कुलस्वामिनी महिला मंच अध्यक्षा सारिका शेळके, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दिपाली गराडे, तळेगाव रा काँ शहराध्यक्षा शैलजा काळोखे, नगरसेविका माया चव्हाण, पूजा वहिले यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी नगराध्यक्ष मयूर ढोरे, संजना बाळासाहेब ढोरे, मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे, नगरसेविका पूनम जाधव, प्रसिद्ध मेकअप अर्टिस्ट जयश्री दौंडकर, प्रज्ञा खोत, उपाध्यक्षा प्रतिक्षा गट, कार्याध्यक्षा चेतना ढोरे आणि प्रतिष्ठानच्या संचालिका, सदस्या व महिला भगिनी अतिशय मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून भेगडे लॉन्स येथे झालेल्या या भव्य मेकअप सेमिनार मध्ये प्रशिक्षक जयश्री दौंडकर व प्रज्ञा खोत यांनी महिला भगिनींना मेकअप संबंधित अनेक प्रकारचे मार्गदर्शन केले. यात सेल्फ मेकअप, हेअर स्टाईल, मेकअप टिप्स, साडी ड्रेपरी, ऑयली स्किन, आय मेकअप इत्यादी प्रकारांचे अभ्यास सत्र पार पडले.

अतिशय उत्साही वातावरणात कार्यक्रम संपन्न होत असताना मेकअप केलेल्या महिला भगिनींनी रॅम्प ऑक करत कार्यक्रमात खूपच मोठी रंगत आणली होती.
यावेळी महिलांसाठी स्पर्धात्मक आणि मनोरंजनपर विविध विषयांवर प्रश्न उत्तरे, उखाणे घेणे आदी प्रकारात लकी ड्रॉ पद्धतीने बक्षीसे देण्यात आली.

याप्रसंगी कार्यक्रमादरम्यान सहभागी तसेच उपस्थित असलेल्या सर्व महिला भगिनींना मोरया महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून सौ. अबोली ढोरे यांच्या वतीने आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. कार्यक्रम सरतेशेवटी मोरया महिला प्रतिष्ठानच्या संचलिकांनी उपस्थित असलेल्या सर्व भगिनींचे आभार व्यक्त केले.

error: Content is protected !!