तळेगाव दाभाडे:
तळेगाव दाभाडे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने रेल्वे समस्या सोडविण्यात याव्यात या विषयी विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदूरानी दुबे यांची भेट घेऊन रेल्वे समस्या सोडविण्यासाठी निवेदन दिले.
शहराध्यक्ष श्री.रविंद्र बाळासाहेब माने,नगरसेविका सौ.शोभा भेगडे, सरचिटणीस सौ.शोभा परदेशी, उपाध्यक्ष श्री.हिम्मतभाई पुरोहित, ओबीसी मोर्चा अध्यक्ष श्री.नितीन पोटे,सोशल मीडिया अध्यक्ष श्री.उपेंद्र खोल्लम, व्यापारी आघाडी कार्याध्यक्ष श्री.सागरशेठ शर्मा,ओबीसी मोर्चा प्रसिद्धी प्रमुख श्री.अमित भागीवंत उपस्थित होते.
पुण्याप्रमाणेच तळेगाव दाभाडे शहर हे पेन्शनरांचे आणि सेकंड होम घेवु इच्छिणाऱ्यांचे पसंतीचे शहर आहे.या ठिकाणी अनेक ज्येष्ठ नागरिक तसेच काहीना काही शारीरिक आजार व व्यंग असलेल्या लोकांसाठी तळेगाव दाभाडेे स्टेशन व घोरावाडी स्टेशनला #Escalator (#सरकते_जिने) बसविण्यात यावेत अशी मागणी केली.
या मागणीवर तळेगाव दाभाडे स्टेशन येथे #Escalator बसविण्याचे रेल्वे प्रशासनाने मान्य केले असल्याचे माने यांनी सांगितले. तळेगाव दाभाडे हे एक महत्वाचे शहर आहे. याठिकाणी MIDC (एम.आय.डी.सी.) असल्यानेे अनेक प्रवासी या स्टेशन वरून ये जा करत असतात.चाकण-खेड भागातील प्रवासी सुध्दा येथुन प्रवास करत असतात.
यासाठी मुंबई पुणे सिंहगड एक्सप्रेस याचा तळेगाव दाभाडे स्टेशन येथे थांबावी.पुणे.जोधपूर एक्सप्रेस रोज सुरू करावी.
मुंबई पुणे कोल्हापुर सह्याद्री एक्प्रेेस ही गाडी सर्वांच्या सोयीची आणि कायम गर्दी असणारी गाडी आहे.या गाडीनेे जास्त करून पास होल्डर प्रवास करत असतात.कोरोना काळामध्येे ही गाडी बंद केल्यापासुन अनेकांंची गैरसोय होत आहे.तरी आपण ही गाडी पुन्हा चालु करावी.
कोरोना काळात लोणावळा- पुणे दरम्यानच्या लोकल बंद केल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.बस आणि गाडी सारखा महागडा पर्याय लोकांना वापरावा लागत आहे.तरी या सर्व लोकल गाड्या पुर्ववत चालु कराव्यात.यामध्ये विशेषतः दुपारी पुण्याला जायला व पुण्याहून यायला लोकल नसल्यामुळे चाकरमानी व विद्यार्थी- विद्यार्थिनींना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.
त्यामुळे लोणावळा पुणे लोणावळा लोकल प्रवाशांंची संख्या पाहता या दरम्यानच्या सर्व लोकल पूर्ववत करून लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात. प्रत्येक लांब पल्ल्याच्या गाडीच्या आधी .कनेक्टींग लोकल असावी जेणेकरून मधल्या स्टेशन वरील प्रवाशांंना लांब पल्ल्याची गाडी पकडणे सोयीचे होईल.
महिला डब्यात पोलीस कर्मचारी तैनात करावेत.आणि घोरावाडी रेल्वे स्टेशन येथे RPF केन्द्र सुरू करावे.या सर्व मागण्यांवर रेल्वे प्रशासनाकडून सकारात्मक पाऊले उचलली जातील असे सांगण्यात आले असल्याचेही माने म्हणाले.