निगडेत  मोफत नेत्र तपासणी शिबीर
निगडे:
   निगडे ग्रामपंचायत व लाईफव्हिजन मेडिकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने निगडे येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर  मोठ्या उत्साहात पार पडले. शिबिरामध्ये एकूण १९५ लोकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ३५ मोतीबिंदू शस्त्रक्रिया आवश्यक रूग्ण सापडले.
  
या रुग्णांची  मोतीबिंदू ऑपरेशन मोफत होणार  आहे.शिबिरामध्ये डोळ्यांची घ्यावयाची काळजी व त्या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिरासाठी  सरपंच  भिकाजी भागवत, उपसरपंच गणेश भांगरे, मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष  महेश पाटील, डॉ. किरण सिंहमर, डॉ. माधव मधुकर,  विजया भामरे , वैशाली आठवले-(तालुका सन्मवयक), पल्लवी आगे (सहाय्यक) ,मेडिकल फाउंडेशन टीम व गावातील कार्यकर्ते व  सर्व नागरिक  उपस्थित होते. शिबिरामध्ये लोकांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणावर दिसून आला.

error: Content is protected !!