वरसुबाई विद्यालयास संगणक संच भेट
टाकवे बुद्रुक :
डोंगरी दुर्गम अदिवासी भागातील विद्यार्थांना तंत्रशिक्षणाचे धडे गिरवणे शक्य झाले आहे. संगणकीय शिक्षण शाळेतच प्राप्त व्हावेत यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढे येत आहे.

अशाच शाळा स्थरावर संगणक हाताळण्यास मिळावा संगणकातील बेसीक कन्सेप्ट समजाव्यात म्हणून वरसुबाई माध्यमिक विद्यालयास संगणक भेट देण्यात आला आहे.

रोटरी क्लब तळेगाव दाभाडे यांचे वतीने पाॅस्को इंडिया प्रा.लि. कंपनीच्या सी एस आर फंडातून एक संगणक संच  आणि प्रिंटर देणगी रूपाने देण्यात आला.

  या मुळे शाळेतील ऑनलाईन कामकाज व विद्यार्थ्यांच्या तंत्र शिक्षणातील विकासासाठी याचा खूप लाभ होणार आहे.या वेळी बोलताना पाॅस्को इडिया कं लि.च्या एच आर हेड नेहा वाघचौरे यांनी कंपनी ची ध्येय धोरणे सांगून शैक्षणिक विकासासाठी आम्ही कटीबद्ध आहोत असे मत व्यक्त केले.
 
कार्यक्रमाचे अध्यक्ष रो.अनिश होले यांनी ही आपले विचार व्यक्त केले.व अशा गरजू शाळांना मदत देता आली याबाबत समाधान व्यक्त केले.या वेळी संतोष देशमुख,अमोल बुडखाळे,प्रदिप देशमुख,विद्या व्यवहारे,उद्धव चितळे,महेश महाजन,भालचंद्र लेले,कमलेश कार्ले,राजन आम्रे,विश्वनाथ मराठे,धनंजय धांडे,निलेश वाकचौरे,ऋषीकेश कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेश गायकवाड यांनी केले सुत्रसंचलन नामदेव गाभणे यांनी केले तर आभार राजेंद्र भांड यांनी केले संतोष बारसकर आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

error: Content is protected !!