विठ्ठला अजब तुझे सरकार… {भाग-1}
यूसलेस,..यू…!
काय केलं हे …?
माझा संतापलेला स्वर…
डॉक्टर– माझ्या मुलीला वाचवा हो …
डॉक्टर माझ्या सुनीताला…
घुसमटणारे शब्द —
हुंदक्याच्या प्रवाहावर बसून प्रापातासारखे कोसळायला लागले!–
समोरचं जोडपं आक्रंदन करतय.
हे सुनीताचे जन्मदाते– अन्नदाते! .
सुनिता आसन्नमरण अवस्थेत..
अर्धवट अबोर्शन ..
हेवी ब्लीडिंग…
मी तिरीमिरीत फोन उचलला फोन डेड –
मनातल्यामनात तळेगाव टेलिफोन एक्सचेंज ला दहा लाख धन्यवाद दिले …
ईश्वराने एक्सचेंजला खूप आयुष्य द्यावं म्हणजे इतरांच आयुष्य खर्ची पडतील…
टेबलावरती बेल दाबून धरली—
मच्छिंद्र झटकन आत आला!
सिस्टरंना पाठव…
तू गावात जा बाईंना घेऊन ये!…पेशंट सिरियस आहे..
मच्छिंद्र वेगात गेला…
सिस्टर धावल्या .
सिस्टर ऑपरेशन थिएटर मध्ये पेशंट घ्या.
लाईफ सेव्हिंग्ज अप्लाय करा, ड्रम लावा हरी अप …
सिस्टर आत वळल्या.
दहा मिनिटात माझी पत्नी डॉक्टर .विजया भंडारी रिक्षानं हजर .
माझा निरोप गेला तशा त्या निघाल्या .
गव्हाळ गहूसर चेहरा चिंतेने माखला होता..
काय झालं ?
त्यांचा प्रश्न .
मी थोडक्यात कल्पना दिली.
त्या लगेच ऑपरेशन थिएटरमध्ये वळल्या ग्लोव्हज चढवले .
ऑपरेशन थिएटरचे दार बंद झालं.
आत डॉक्टर सौ भंडारी, सिस्टर , मेट्रन ,मी .
त्यांनी परिस्थिती पाहिली एका क्षणात d&c ची तयारी सुरू झाली.
आता ती माझी पत्नी नव्हती, मुलांची माता नव्हती! गृहिणी नव्हती1- होती ती फक्त डॉक्टर!
डॉक्टर सौ विजया भंडारी यांच्या नेत्र संकेतानुसार आम्ही भराभरा हलत होतो !
बीपी ,ब्लड सारी-कडे त्यांची नजर घारीसारखी फिरत होती!
अर्ध्यातासाने आम्ही बाहेर आलो!
सुनीताचे आई-वडील धावले.
डोन्टवरी पेशंट ठीक आहे.
डॉक्टर सौ भंडारींनी दिलासा दिला आणि थकलेल्या देहानं पण समाधानी मनाने त्या वर जाण्यासाठी वळल्या–
” चहा पाठवते हं! डॉक्टर सौ भंडारींची जागा त्यांच्यातल्या पत्नीने घेतली होती .
मी मान हलवली
कन्सल्टिंगमध्ये आलो.मी थकून खुर्चीत बसलो! .
समोर सुनीताचे आई-वडील.
हा आता बोला, मगाशी मला राहवलं नाही म्हणून मी संतापलो होतो .
पण मला हे कळत नाही की घरच्या घरी गर्भपात करण्याचा प्रयत्न तुम्ही का केलात ,तुम्ही अडाणी ,अशिक्षित दिसत नाहीत.
अशा गावठी उपायानं पेशंटच्या जीवाला धोका होतो, हे एवढे तुम्हाला समजू नये ?
- आंदर मावळमध्ये पर्यटन व्यवसाय वाढवून तरुणांसाठी मोठी रोजगारनिर्मिती करणार : बापूसाहेब भेगडे
- मंगळवार, १२ नोव्हेंबर रोजी संत नामदेवमहाराज जयंती सोहळ्याचे आयोजन
- मावळ मनसेचा बापूसाहेब भेगडे यांना पाठिंबा
- धनगर बांधवांचा अपमान केल्याप्रकरणी सुनील शेळके यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार – बापूसाहेब भेगडे
- जनतेकडून मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून विरोधकांकडून ‘रडीचा डाव’ – सुनिल शेळके