टाकवे बुद्रुक:
येथील कै. तुकाराम (बुवाभाऊ) दशरथ कोद्रे यांच्या दशक्रिया विधी निमित्त लाईफ व्हिजन मेडिकल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबीर व मोतिबिंदु शस्त्रक्रिया आयोजित केली आहे.
गुरुवार १३/०४/२०२३ रोजी राहत्या घरी,टाकवे बु।। ता. मावळ, जि. पुणे येथे हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. बुवा कोद्रे आंदर मावळातील भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. ग्रामीण पक्ष संघटना वाढीसाठी केलेले काम वाखण्या सारखे होते.
कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता पक्ष संघटना वाढीसाठी केलेले कार्य निश्चितच कौतुकास्पद असल्याच्या भावना भाजपाच्या नेत्यांनी व्यक्त केल्या. तर माझा जीवाभावाचा सहकारी गमावल्याचे दु:ख माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी व्यक्त केले.
कोद्रे यांच्या दशक्रिया विधी निमित्त देखील सामाजिक उपक्रम राबवण्यावर भर देण्यात आला आहे.
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस