कर्तुत्वाची जेथे प्रचिती-_ तेथे कर माझे जुळती!- कर्तुत्व –एक सामाजिक अपेक्षा!..—
.{ भाग 1}
कर्तुत्व या शब्दाला अनेक छटा आहेत!अनेक रंग आहेत,उपजत आणि परिस्थितीने निर्माण झालेल्या मनाच्या भावभावनांचा आपल्या कृतीतून होणारा अविष्कार म्हणजे कर्तृत्व होय!
कर्तुत्व हा शब्द चांगल्या कृतीसाठी वापरला जातो! मग ती वैयक्तिक असेल, कौटुंबिक असेल, सामाजिक असेल ,राष्ट्रीय पातळीवर असेल, समाजाला पूर्ण विकसित झालेलं आपलं कर्तृत्व केव्हा दिसतं हा तुम्हाला आणि मला पडलेला प्रश्न आहे?–
याचा शोध घेण्याचा जर आपण प्रयत्न केला तर त्याच्या मुळाशी दडलेल्या अनेक गोष्टींचा आपला परिचय होईल यात शंका नाही!
आपलं कर्तृत्व गाजवणारी आणि नावारूपाला येणारी आणि त्यामुळेच सर्वांच्या स्मरणात राहणारी व्यक्ती ही कलेची उपासक, कष्टकरी, अभ्यासू ,अनुभवी आणि त्यागी वृत्तीचीच असावी लागते, त्याशिवाय त्या व्यक्तीकडून अतुलनीय असं कार्य घडू शकत नाही! आणि असं कार्य घडल्याशिवाय ती कर्तुत्वान व्यक्ती म्हणून कधीच गणली जात नाही!
आपलं कर्तव्य पारपाडीत असताना नेतृत्वाचे गुण त्यांच्या अंगी असावे लागतात– म्हणजेच कष्टाच्या जंगलात बिंदास घुसणे, उपक्रमांचा गालिचा सतत विणणे, सर्वांना बरोबर घेऊन चालणे अशी भूमिका त्या व्यक्तीला नेहमीच घ्यावी लागते!
सर्वांच नेतृत्व करीत असताना त्यांना कार्यप्रवृत्त करणे हे सुद्धा तेवढच महत्त्वाच आहे!
तरच भरीव असं कार्य घडतं आणि कर्तृत्व दिसून येतं!
राष्ट्रीय पातळीवर स्वातंत्र्यपूर्वकाळात या सर्व वरील विवेचनाचं दर्शन आपल्याला प्रत्येक व्यक्तीच्या चरित्रातून घडतं मग ते स्वातंत्र्यवीर सावरकर असो- लोकमान्य टिळक असो -राष्ट्रपिता महात्मा गांधी असो, जवाहरलाल नेहरू असो–
या सर्वांच कर्तुत्व इतक मोठ आहे की त्यांना जाऊन इतकीवर्षे झाली तरी त्यांना आपण सलाम करतो! त्यांच्या पुढे आपण नतमस्तक होतो, कर्तृत्व सिद्ध होण्यासाठी सत्कर्माची आवश्यकता असते! सत्कर्म करण्यासाठी उत्तम संस्काराची आवश्यकता असते! उत्तम संस्कार एका दिवसात घडत नाहीत त्याला काही काळ जावा लागतो आणि तो काळ चांगल्या विचारांच्या, आचारांच्या व्यक्तींच्या सहवासाचा- परिस्थितीचा असावा लागतो!
उत्तम फुललेलं झाड पूर्णत्वास येण्यासाठी जशी पोषक जमीन ,पोषक हवामान, योग्य तितक्या पाण्याची आवश्यकता असते
- तसेच उत्तम व्यक्तिमत्व यासाठी सुद्धा उत्तम वातावरणाची आवश्यकता असते!
कुठल्याही कर्तृत्वसंपन्न व्यक्तीच्या आयुष्याचा मागोवा जर आपण घेतला तर या सर्व गोष्टी आपल्याला प्रकर्षाने दिसून येतात! .
कर्तृत्वसंपन्न व्यक्ती नेहमी सकारात्मक दृष्टीकोनातून विचार करते, संकटावर मात करते, संघर्षावर मात करते, अपयशातून बोध घेते आणि या सर्व अनुभवाच्या शिदोरीवर ती आपली यशाची वाटचाल करते!
आम्ही नेहमी कर्तृत्वसंपन्न व्यक्तीची मुलाखत घेत असतो! असेच अतिशय अल्प काळात नावारूपाला आलेल्या व्यक्तींचा परिचय– उद्याच्या अंकात—
(शब्दांकन – डाॅ.ला.शाळिग्राम भंडारी ,तळेगाव दाभाडे)
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस