मातृदेवो भव-_ पितृ देवो भव!
मित्रांनो,
एकदा एकाला विचारलं की- तुझं जग कुठून सुरू होत आणि ते कुठ संपत?-त्याने प्रत्येकाच्या मनात असलेलच फार सुरेख उत्तर दिलं तो म्हणाला की-हे माझंजग आहेना ते–” आईच्या कुशीतून सुरूहोतं आणि वडिलांच्या चरणात संपत”!

पुढे जसजसं माझंवय वाढतजातं तसंतसं ते- समाधानाने फुललेल्या पत्नीच्या अंगणात सुरू होतं आणि माझ्याच मुलांच्या डोळ्यात त्या स्वप्नपूर्तीत येऊन थांबतं”– चला तर मित्रांनो– आज आपण चिंतनाचा हाच विषय घेऊन पुढे काय काय घडतं ते प्रत्यक्ष पाहूया–

अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आईची ममता आणि वडिलांची क्षमता नेमकी ओळखण हे जगातलं सगळ्यात अवघड काम असतं! कारण जगात फक्त तेच असतात की जे आपल्यावर आयुष्यभर निस्वार्थ प्रेम करीत असतात!माया करतात! आपला उत्साह वाढवतात आपणास ऊर्जा देतात!

ते वेळोवेळी आपल्या वाढणाऱ्या आणि घडणाऱ्या जीवन प्रवासात योग्य तो मार्ग दाखवतात! म्हणूनच जगाच्या सोबत राहताना आई-वडिल दोघही नेहमीच आपल्या बरोबरच असतील तर आपोआपच सर्व जग आपल्यापासून कधीच दूर जात नाही! मित्रांनो हीच आपली जीवनशैली आपल्याला आयुष्यभर जपायची असते!

त्यामुळे होईल काय की – निससंशय  सर्वजगच आपल्याबरोबर  असेल! नाहीतर होईलकाय की– आपल्याच अश्रूंना आपल्याच डोळ्यात  जागा मिळणार नाही!  मग प्रत्यक्ष आपलं काय होईल याची नुसती कल्पनाच केलेली बरी! यासाठी आपल्या यशस्वितेचा गर्व आई वडिलांसमोर कधीच दिसतं कामा नये!

ही आपल्याला मनापासून काळजी घेतली पाहिजे! कारण त्यांनी आपल्या आयुष्याचं मोल ठरवूनच जीवनाच्या वाटेवर वेळोवेळी आपल्याला यश मिळवून दिलेलं असतं! म्हणूनच शेवटी हे शाश्वत सत्य आहे की- आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर  लीनता आणि नम्रता यांना आपल्या स्वभावात  अग्रस्थान देऊन ती प्रत्यक्ष आपल्या कृतीत आणली पाहिजेत! एक प्रसंग आहे.

आमच्या सदानंदने- आपल्या जन्मदातेला वृद्धाश्रमात दाखल केल! त्याच सदानंदाच्या वाढदिवसानिमित्त- शुभेच्छा देण्यासाठी त्या मातेने रात्री दोन वाजता वृद्धाश्रमातून त्याला फोन केला! आईने आपली झोपमोड केली म्हणून मनस्ताप व्यक्त करणाऱ्या आपल्या लेकराला ती माता म्हणते की- बाळा– तुझी मी झोपमोड केली त्याबद्दल  सर्वप्रथम मला क्षमा कर!

पण कदाचित तुला माहितही नसेल की-ज्या दिवशी तुझा जन्म झाला बेटा-त्या दिवशी प्रसववेदनेने मी इतकी तळमळत होते की- रात्रभर मी झोपू शकले नाही! लेकरा तुझी झोपमोड झाली त्यासाठी तुझ्या या अभागी मातेला- या माझ्या चुकीला तू क्षमा कर! मित्रांनो- मला प्रत्येक घरी असा सदानंदनव्हे तर -तर-आईची काळजी घेणारा श्रावणबाळ हवा आहे.हाच आजच्या आपल्या चिंतनाचा विषय होता.
( शब्दांकन- ला.डॉ.शाळीग्राम भंडारी,तळेगाव दाभाडे)

error: Content is protected !!