वडगाव मावळ:
अवकाळी पावसाने आंदर मावळातील फुल उत्पादक शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतक-यांनी केली आहे.

  किवळेतील रोशन भालेराव पिंगळे यांच्या कृषी पर्यटन केंद्राचे नुकसान झाले. वादळी वा-या सह आलेल्या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीने शेतक-यांचे कंबरडे मोडले आहे.

लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे, इतके मोठे नुकसान कसे सहन करायचे या विवंचनेत शेतकरी बांधव आहे. रोशन पिंगळे म्हणाले,” माझे पॉलिहाउस  खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच नामदेव बाबुराव पिंगळे  व हरिभाऊ पवळे यांचे देखील पॉलिहाउस जमीन उद्वस्त झाले. हरि पवळे म्हणाले,”आमचे एक एकर पाॅलीहाऊस चे नुकसान झाले. बायकोच्या नावावर फुलशेती होती. हाताला काम मिळत होते. रोजगार बुडाला आणि मोठे नुकसान झाले.

तसेच विकास पिंगळे , प्रतिक पिंगळे, गोरख पिंगळे, संतोष पिंगळे , विश्वनाथ जाधव, सुधिर जाधव, अक्षय पिंगळे आणि इतर शेतकऱ्यांच पॉलिहाउस धारकांच खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तरी शासनाने त्वरीत दखल घ्यावी.

error: Content is protected !!