पवनानगर:
ग्रामीण भागात शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी ब्लूम सिल फाऊंडेशनचा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू आहे. ज्यामुळे ग्रामीण भागातील शैक्षणिक उपक्रमांना बळकटी मिळत आहे. विद्यार्थी,पालक आणि शिक्षक या उपक्रमाचे कौतुक करीत आहे.

ब्लूम सिल फाऊंडेशनचे प्रमुख  प्रदीप सागर , शिल्पा प्रदीप सागर  यांच्या पुढाकारातून व सुप्रिया पेनकर,महेंद्र ,वेद प्रकाश स आणि मावळ तालुका शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष  गोरख जांभुळकर यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम सुरू आहे.

विशेषत: काले केंद्रातील काले,धालेवाडी,प्रभाचीवाडी, सावंतवाडी,महागाव,दुधिवरे.व.वारु केंद्रातील वाघजाई वस्ती, चिंचवाडी-कोथुर्णे  या आठ शाळेत ब्लूम सिल फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गोर गरीब विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येते.

विशेष म्हणजे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या पूर्वेला साहित्य विद्यार्थ्यांना मिळते. या  शाळेत ब्लूम सिल फाउंडेशनच्या माध्यमातून स्वच्छ भारत सुंदर भारत या उपक्रमा अंतर्गत शौचालय बांधकाम, शाळा दुरुस्ती, रंग रंगोटी, वॉल कम्पाउंड पाण्याची टाकी  इत्यादी कामे करण्यात आली आहे. सामाजिक संस्थेच्या मदतीने शैक्षणिक गुणवत्ता वाढीची ही बाब निश्चितच कौतुकास्पद असून या उपक्रमाचे अनुकरण ग्रामीण भागातील इतर शाळांमधून होणे गरजचे आहे.

error: Content is protected !!