वडगाव मावळ:
मावळ तालुक्याचे श्रद्धास्थान व वडगावचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज यांच्या चैत्र पौर्णिमा उत्सवानिमित्त ६ व ७ एप्रिल रोजी विविध धार्मिक व मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये प्रामुख्याने मानाचे बगाड, शोभेचे दारूकाम, भजन स्पर्धा, मनोरंजनात्मक कार्यक्रम, कुस्त्यांचा आखाडा आदींचा समावेश असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर व उत्सव समितीचे अध्यक्ष संजय दंडेल यांनी दिली.
गुरुवारी दि.६ रोजी पहाटे चार वाजता श्री पोटोबा महाराजांचा अभिषेक, सकाळी ६ वाजता श्री हनुमान जन्मोत्सव, दुपारी ४ वाजता मानाचे बगाड व मानाच्या काठ्या, रात्री ८ वाजता शोभेचे दारूकाम, रात्री ९ वाजता भजन स्पर्धा होईल. रात्री ९ वाजता शिवाजी चौक येथे अभिनेत्री संजना काळे व सहकाऱ्यांचा तारका लावणी हा लावण्यांचा कार्यक्रम होणार आहे.
शुक्रवारी दि.७ रोजी सकाळी आळंदी येथील ज्ञान अमृत वारकरी शिक्षण संस्थेच्या बाल भजनी मंडळाच्या सहभागाने पालखी मिरवणूक, दुपारी ४ वाजता डी. एड. कॉलेजच्या मैदानावर कुस्त्यांचा आखाडा होईल. मनोरंजनाच्या कार्यक्रमात रात्री आठ वाजता बॉलिवूड नाईट हा कार्यक्रमाने उत्सवाची सांगता होणार आहे.
देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, उपाध्यक्ष गणेश ढोरे, सचिव अनंता कुडे, खजिनदार चंद्रकांत ढोरे, सुभाष जाधव, तुकाराम ढोरे, किरण भिलारे, अरुण चव्हाण, अशोक ढमाले, तुकाराम काटे, सुनिता कुडे, मार्गदर्शनाखाली उत्सव समितीचे अध्यक्ष संजय दंडेल, कार्याध्यक्ष सचिन कराळे, शिवाजी येळवंडे, कार्यक्रम प्रमुख बाळासाहेब तुमकर, अनिकेत भगत, अक्षय रौंधळ, संकेत चव्हाण, खंडू जाधव, केदार बवरे, समीर ढोरे, संतोष ढमाले अनिल कोद्रे, सुधीर ढोरे, सोमनाथ धोंगडे, सुहास विनोदे आदींनी संयोजन केले आहे.
उत्सवानिमित्त भजनस्पर्धा !
दरम्यान उत्सवानिमित्त गुरुवारी रात्री ९ वाजता ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात भजनस्पर्धा होणार असून स्पर्धेसाठी अनुक्रमे ११ हजार १११, ७ हजार ७७७, ५ हजार ५५५, ४ हजार ४४४ व ३ हजार ३३३ रुपये अशी रोख बक्षिसे, प्रत्येक सहभागी संघास २ हजार रुपये व सन्मानचिन्ह, उत्कृष्ट वादक, गायक यांना वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहे.
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस