राजगुरुनगर :
भामा आसखेड धरणग्रस्त शेतक-यांची जिल्हा पुनर्वसन कार्यालयात जिल्हाधिकारी राजेश देशमुख व जिल्हा पुनर्वसन अधिकारी संदेश शिर्के यांच्यासोबत धरणग्रस्तांचे पुनर्वसन या विषयी बैठक झाली.
प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून ते लवकरात लवकर सोडवले जातील असे आश्वासन मिळाल्यानंतर लगेचच 68 खातेदारांपैकी आठ खातेदार जे ताबा मिळण्यापासून वंचित होते त्यांच्या अर्जावरती तात्काळ कार्यवाही झाली.
येणाऱ्या दिवसांमध्ये ३८८ बांधवांचे प्रश्न मार्गी लागणार असून नवीन न्यायालय निकाल प्राप्त 160 जणांना 16 /2 नोटीस देऊन तात्काळ चलन भरून घेण्यात येतील व त्यांचे पुनर्वसन केले जाईल असे आश्वासन जिल्हा पुनर्वसन अधिकारी शिर्के यांनी दिले असून तात्काळ कार्यवाहीला सुरुवात केली जाईल अशी माहिती धरणग्रस्त शेतक-यांनी दिली.
भामा आसखेड प्रकल्प बाधित शेतकरी शंकर मारुती साबळे, सत्यवान नवले ,काळुराम गडदे, सुभाष तळेकर, माजी सभापती बनसू शेठ होले ,मल्हारी शिवेकर ,दत्तू शिंदे , नवनाथ शिवेकर, तुकाराम शिंदे अन्य धरणग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस