कामशेत :
येथे श्रीराम जन्मोत्सव व राम नवमीच्या शोभायात्रेत श्रीराम भक्तांनी मोठी गर्दी केली होती. या वर्षाची ग्रामीण भागातील रेकॉर्ड ब्रेक गर्दी म्हणावे लागेल. कामशेत शहरासह नाणे मावळ परिसरातील ४५ गावांनी या शोभायात्रेत सहभाग घेतला होता.
हिंदू उत्सव समिती व ग्रामीण परिसरातील भाविकांच्या वतीने श्रीराम नवमी उत्सव साजरा करण्यात आला .पंडित नेहरू विद्यालय पासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत’ जय श्रीराम’ च्या गगनभेदी घोषणा, भगवे झेंडे ,पताका,फटाक्यांची आतिषबाजी करत सकल हिंदू बांधव सोभयात्रेमध्ये सहभागी झाले.
बच्चे कंपनी सह महिला,युवक,युवती,व्यापारी, जेष्ठांनी या शोभायात्रेत सहभाग घेत रेकॉर्ड ब्रेड गर्दी केली. कामशेत शहर व नाणे मावळ परिसरातील ४५ गावांनी सहभाग घेतला.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात अँड. मृणाली देशपांडे यांचे व्याख्यान झाले त्यानंतर धर्मवीर स्वराज्य रक्षक मालिकेतील शिवशाहीर संतोष साळुंखे यांच्या पोवाडयाचा कार्यक्रम झाला.कार्यक्रमाचे आयोजन उत्सव समिती कामशेत सर्व ग्रामीण परिसर वतीने करण्यात आले.
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस