कामशेत :
येथील माऊलीनगरच्या श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम झाले. प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
दरवर्षी हा सोहळा थाटामाटात साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षाचा सोहळा रंगला. राम नामाच्या गजरात भाविक दंगून गेले होते.
काकड आरती , किर्तन,महाप्रसाद आदि धार्मिक कार्यक्रम झाले. ह. भ. प. तुषार महाराज दळवी यांचे रामजन्माचे किर्तन झाले.सायंकाळी श्रीरामांची पालखीतून मिरवणूक झाली.
ढोल ताशांचा निनाद आणि टाळ मृदुंगाचा गजर करीत निघालेल्या पालखी सोहळ्यात कामशेत शहरांसह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस