ज्ञानगंगा ज्याचे घरी-तेथे कल्पतरू  वास करी!
मित्रांनो,
कल्पतरू असावृक्ष आहे की ज्याच्या खाली आपण बसलो तर आपल्या मनातल्या सर्व काही आशा आकांक्षा या पूर्ण होतात! संस्कृत मध्ये एक सुभाषित आहे— सर्व गुणसंपन्नहा; विशाल कुलसंभवा; विद्या हिना न शोभंते! निर्गंधहा; इव  किंशुकाहा!

मित्रांनो , खूप  खानदानी परिवारात जन्मलेला आहे! सर्व गुण संपन्न आहे! पण विद्येचा अभाव आहे; तर त्याची परिस्थिती त्या पळसाच्या फुलासारखी होणार आहे!; कारण त्यात गंधच नसल्याने मग अशा फुलाला कोण जवळ करणार?– म्हणजेच त्यात ज्ञानाचा! बुद्धिमत्तेचा गंध नाही.

म्हणून म्हणून अर्थपूर्ण जीवन जगायचे असेल तर आपल्याला कुठलीही विद्या आत्मसात करणे आवश्यक आहे! आणि ती जर झाली तर- तर कल्पवृक्ष आपल्या दारीच येणार आहे! म्हणून–मित्रांनो या जगातील खरी संपत्ती ज्ञान आहे असे अनेक जण नेहमी सांगत असतात कारण जो ज्ञानी असतो तोच जगातील  खरा श्रीमंत असतो असे म्हणतात.

त्यामुळे आपल्याला खऱ्या अर्थाने सुखी व्हायचे असेल तर आपण ज्ञान मिळण्यासाठी स्वतः आग्रही असायला हव कारण एक मात्र नक्की आहे की जो माणूस सतत ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतो तोच यशस्वी होतो त्याची प्रगती होते हे शाश्वत सत्य आहे अर्थात हे ज्ञान कसे मिळवावे किंवा कोणा कडून मिळवाव याचा काही एक विशिष्ट असा नियम नाही.

  पण एवढं मात्र निश्चित आहे की जो ज्ञान मिळवतो तोच प्रगती करतो हे मात्र सर्वांचं  सर्वसाधारण असं निरीक्षण आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं आता याची पुढची पायरी म्हणजे आपण  ज्ञान मिळण्यासाठी कोण कोणती ठिकाणी शोधली पाहिजेत कुठला कालावधी निश्चित केला पाहिजे कोणाकडून आपल्याला ज्ञान प्राप्त होईल .
 
याचा शोध घेतला पाहिजे याचं सरळ उत्तर असा आहे की ज्ञान मिळवण्यासाठी कुठलेही असं विशेष ठिकाण नाही कुठलीही अशी ठराविकच  वेळ नाही किंवा विशिष्ट व्यक्तींनाही हे ज्ञानाचे विखुरलेले कण वेळोवेळी डोळसपणे आपण शोधले पाहिजे आत्मसात केले पाहिजे आणि प्रत्यक्ष कृतीत आणले पाहिजे तरच या ज्ञान आणि विज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला श्रीमंती प्राप्त होईल आणि पर्यायाने सुख प्राप्त होईल.

  जो शोधण्याची  धडपड आपण करतो आहोत तो आनंद  आपल्याला आपोआपच प्राप्त होईल मित्रांनो आणखी एक दुसरा  स्वीकारण्यासारखा एक सोपा मार्ग आहे तो म्हणजे एखाद्या क्षेत्रातील यशस्वी माणसाच्या अनुभवाची शिदोरी स्वीकारून  त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण आपल्या यशस्वी हम रस्त्यापर्यंत पोहोचण त्यांनी त्यांच्या कष्टातून मिळवलेल्या ज्ञानाच  मनन आणि चिंतन करण व तेच प्रत्यक्ष आपल्या कृतीची त्याला जोड  देऊन आपण यश प्राप्त करण  हा सुद्धा एक चांगला ज्ञान मिळवण्याचा आणि पर्यायाने श्रीमंत होण्याचा सहज सुलभ मार्ग आहे.
 
  ( शब्दांकन-  ला.डॉ. शाळीग्राम भंडारी, तळेगाव दाभाडे)

error: Content is protected !!