काल्याच्या किर्तनाने पाटण येथील अखंड हरिनाम
सप्ताहाची भक्तीमय वातावरणात सांगता
लोणावळा:
मावळ तालुक्यातील पाटण गावात गुढी पाडव्यापासून सुरू झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता काल्याच्या किर्तनाने करण्यात आली.
सकाळी काकड आरती, विष्णुसहस्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, गाथाभजन, हरिपाठ, प्रवचन, किर्तन, महाप्रसाद व हिरजागर असे या सप्ताहाची दैनंदिन रुपरेषा होती. दि. २२ मार्च पासून सुरु झालेल्या या महायज्ञात अनेक नामवंत अभ्यासू किर्तनकार व प्रवचनकारांची किर्तने व प्रवचने झाली.
तालुक्यातील जेष्ठ किर्तनकार हभप नाथाबुवा मोरे व जेष्ठ वारकरी गबळुबुवा मालपोटे सितारामबुवा हुलावळे यांच्या मार्गदर्शनाखाली हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गावतील जेष्ठ नागरिक दशरथ तिकोणे यांना गावासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल पाटण भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पहिल्यादिवशी ( २२ मार्च )हभप अनिता मोरे यांचे प्रवचन तर हभप किरणमहाराज मोरे (शिरूर)यांचे नामपर किर्तन झाले दुसर्या दिवशी( २३मार्च) हभप मोनिका मांडेकर यांचे प्रवचन तर हभप.कृष्णामहाराज पडवळ (चांदिवली मुळशी) यांचे नाम महात्म्य सांगून देवाच्या स्वरुपाच वर्णन करणारे किर्तन झाले तिसर्या दिवशी (२४मार्च)हभप. दत्ता महाराज दोन्हे (मुळशी) यांचे प्रवचन तर हभप डाॅ.सुदाम महाराज पाणेगावकर (लातूर) यांचे संतांचे महात्म्य सांगणारे किर्तन झाले चौथ्या दिवशी(२५ मार्च) हभप विठ्ठल महाराज पांडे यांचे प्रवचन तर हभप रविंद्र महाराज पिंपळगावकर (प्रति इंदुरीकर संहमनेर अहमदनगर) यांचे भक्तिपर किर्तन झाले पाचव्या दिवशी (२६मार्च)हभप निकिता भांगरे यांचे प्रवचन तर हभप.पांडुरंग महाराज साळुंखे( पळुस सांगली ) यांचे भक्तिचे महात्म्य या विषयावर किर्तन झाले.
सहाव्या दिवशी(२७मार्च) हभप बाबाजी महाराज काटकर यांचे प्रवचन तर झी टाॅकिज फेम हभप सुनिलमहाराज गाडेकर(जालना) यांचे वेदांताचे अभंग यावर किर्तन झाले.सातव्या दिवशी(२८मार्च) मावळभूषण हभप तुषार महाराज दळवी यांचे प्रवचन तर हभप प्रशांतमहाराज तकोते यांचे (अकोला) यांचे मागणीपर पर किर्तन झाले.
आठव्या दिवशी(२९ मार्च)हभप लक्ष्मण महाराज कोकाटे (बारामती) यांच्या काल्याच्या किर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात आली.यावेळी पाटण ग्रामस्थ ,महिला वर्ग, तरूण त्याचबरोबर गावाच्या परिसरातील सर्व टाळकरी, माळकरी, भाविक, भजनी मंडळ यांनी एकत्र येऊन सप्ताह साजरा केला.
जसा जसा काळ बदलतो आहे तसं तसं सप्ताहाच स्वरुप देखील बदलत चाललेआहे.डेकोरेशन असलेला मोठा मंडप, साउंड सिस्टीम, भव्य व्यासपीठ, सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण, महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, गायक, वादक यांची मांदियाळी वेशभुषेतील संत महात्म्यांचे पात्रांचे कार्यक्रमात आगमन असे भव्य आणि आधुनिक स्वरुप या अखंड हरिनाम सप्ताहाला लाभलं.
रोजच्या कीर्तनाला टाळकरी, पखवाज वादक, पेटी वादक, गायक, विनाधारी असे सर्वजण पांढर्या शुभ्र पोशाखात हजर असत. डोक्यावर टोपी, खांद्यावर उपरणे, गळ्यात टाळ, कपाळावर बुक्का असा एकंदरीत पेहराव करून वातावरण भक्तिमय व चैतन्यमय झाले होते.
तालुक्यातील अनेक नामंकीत किर्तनकार व प्रवचनकार तसेच लोकप्रतिनिधी व नागरिकांनी या सोहळ्यास उपस्थिती दर्शवली. पाटण गावातील तरूण वर्ग व प्रामुख्याने महिला वर्गाने गावतील जेष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम नियोजन केले.
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस