टाकवे बुद्रुक:
आंदर मावळाला शहराशी जोडणा-या सावळा रस्त्यावरील कुणे गावच्या पुलाला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यामुळे पूलाचा कठडा तुटला आहे. तीव्र वळणावर हा पूल असून कठडा तुटल्याने अपघाताची शक्यता आहे.

काही वर्षापूर्वी या पूलाची दुसरी बाजू अशीच अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तुटली होती,त्या दुरुस्तीच्या कामाला कित्येक महिने लोटले पण काम काही वेळेवर झाले नाही.शेवटी प्रसार माध्यमांनी या प्रश्नावर सातत्याने बोट ठेवल्याने हे काम मार्गी लागले होते.

आता या पुलाची दुसरी बाजू तुटली हे काम कधी होईल हा प्रश्न पूर्व अनुभव पाहता नागरिकांना वाटणे साहजिकच आहे. कुणे गावच्या जवळचा हा पूल तीव्र वळणावर आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला तीव्र उतार आहे.या शिवाय अंरूद रस्ता आहे.

या रस्त्याने सावळा,गोंटेवाडी,ढोंगेवाडी,तळपेवाडी,कळकराई,माळेगाव खुर्द,माळेगाव बुद्रुक,पिंपरी सह अन्य गावातील नागरिकांचे दळणवळण असते. शहरातील शेकडो पर्यटक या परिसरात येत असतात. वाहनांची कायमच वर्दळ या रस्त्यावर असते. रात्रीचा प्रवास मोठा असतो. अनेक कामगार दुचाकीवरून रात्रपाळीच्या कामाला ये जा करीत असतात,या पुलावर उजेडाची कोणतेही सोय नाही .त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने या पूलाचा तुटलेला कठडा बांधून द्यावा अशी मागणी नारायण थरकुडे यांच्यासह अन्य वाहन चालकांनी केली आहे.

error: Content is protected !!