शब्दा विना कळले हो– नाते मैत्रीचे!– आयुष्याच्या सफरीतील अनेक पान उलटतात! नवनव्या शतकातील नवनवीन दशक पालटतात! वळणा वळणावर अनेक गुरु भेटतात तसेच अनेक मित्र मैत्रिणी ही आपल्याला भेटतात– आणि ते आपल जीवन समृद्ध करीत असतात.

त्या आपल्याच आयुष्याला आकार देत असतात! मित्रांनो– निखळ मैत्रीसाठी हवी असते सहृदयता आणि तीच मैत्रीच्या बाबतीत आपल्या आयुष्यात कमी पडते! कवी श्रेष्ठ कुसुमाग्रजांच एक वाक्य आहे– प्रेम हे माणसाच्या संस्कृतीचा सारांश आहे! हे शाश्वत सत्य आहे आणि तो तर मैत्रीचा पाया आहे!मैत्री हे अतिशय सुंदर नातं आहे.

ते केव्हाही कोणाशीही आपल्याला जोडता येतं फक्त गरज असते ती आपल्यात वसत असलेल्या प्रेमाची! मैत्री कधीही कोठेही कोणाशीही होऊ शकते फक्त ती टिकवण फार महत्त्वाचं असतं! आणि जर ती टिकली तर ती निश्चितच आपल्या आयुष्यभरची अमूल्य ठेव असते.

मित्रांनो हे मैत्रीचं नातं टिकवायचं असेल तर एक साधा आणि सोपा उपाय म्हणजे आपल्या एकमेकांकडून अवास्तव अशा अपेक्षा कधीच असू नये कारण समोरच्याला त्या पूर्ण करता येणार नाहीत किंबहुना त्याचं ओझं वाटायला लागेल असं ज्यावेळी वाटेल त्यावेळी तिथे तिथेच मैत्री संपुष्टात येईल हे निर्विवाद सत्य आहे कारण आपली जबाबदारी म्हणजे नक्की काय आहे.

हे समोरच्याच्या  नजरेतुन आपण जर बघितलं तर केव्हाही कुठेही गैरसमज होणार नाही कारण तुम्ही किती प्रेम करताय त्यापेक्षा समोरच्याला किती प्रेम तुमच्याकडून अपेक्षित आहे त्यावर त्याच्या कर्तव्याची  जाणीव तुम्हाला निश्चितपणे  होणार आहे या साऱ्या गोष्टींचा संगम ही तुमची नाती आणि तुमचे संबंध जोडायची गुरुकिल्ली आहे .

आणि ही एकदा का ही गुरुकिल्ली जर तुम्हाला सापडली  तर तुमच्या आयुष्यात  शेवटच्या श्वासापर्यंत ती नाती टिकणार आहे कारण मित्रांनो ही सारी नाती आपल्या  एकमेकांच्या मूळ गुणसूत्रांवर  जोडली गेली असतील  तर ती एकमेकांच्या त्यागाच्या पायावर  उभारलेली असतात.

  मित्रांनो ,जेथे कुठल्याही फळाची अपेक्षा न करता फक्त निखळ प्रेमाचं नातं  असतं   कारण अश्या ह्या नात्यात जात-पात-धर्म कधीही आडव  येत नाहीत याचं उत्तम उदाहरण म्हणजे महाभारतातील कृष्ण सुदामा यांच्या  मैत्रीचं असं निखळ मैत्रीचं असलेले प्रसिद्ध असं मैत्रीचं नातं आपल्या सर्वांना ज्ञात आहे
 
म्हणूनच शेवटी मित्रांनो परमेश्वराने  आपल्याही जीवन प्रवासातील एखाद्या वळणावर असच मैत्रीचे अतूट नातं आपल्याला प्राप्त हो हीच त्या निर्गुण निराकार परमेश्वर  चरणी प्रार्थना करून येथेच थांबतो.
( शब्दांकन- लायन डॉक्टर शाळीग्राम भंडारी)

error: Content is protected !!