कामशेत:
  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ब्राम्हणवाडी(बौर) येथे  वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. माजी सरपंच मारुती वाळुंज यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
 
शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला.  शाळा व्यस्थापन समिती चे अध्यक्ष  संतोष वाळुंजकर,उपाध्यक्ष नारायण कंक व सर्व सदस्य उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य ग्रामपंचायत संघटना अध्यक्ष गणेश महाराज वाळुंजकर, सामाजिक कार्यकर्ते सतिश वाळुंजकर, माता पालक व शिक्षक पालक संघ तसेच सर्व ग्रामस्थ या सर्वांचे सहकार्य लाभले .

कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक तानाजी शेखरे यांनी केले, स्वागत रोळे मॅडम,शारदा मॅडम व भाविका मॅडम यांनी केले. आभार राऊत सर यांनी मानले.

error: Content is protected !!