टाकवे बुद्रुक:
  कल्हाट   ग्रुप ग्रामपंचायतीच्या  उपसरपंच पदी बुधाजी गुणाजी जागेश्वर यांची  बिनविरोध निवड  झाली. मावळते  उपसरपंच   सुभाष पवार यांनी आपल्या उपसरपंच पदाचा  राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक झाली.
 
ही निवडणूक ग्रुप ग्रामपंचायत कल्हाट कार्यालयामध्ये  सरपंच विजया संतोष जाचक  यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

यावेळी उपसरपंच पदासाठी बुधाजी जागेश्वर यांचा एक मेव अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक अधिकारी ग्रामसेवक राठोड यांनी जाहीर केले. यावेळी ग्रामपंचायत माजी उपसरपंच जावेद मुलानी,सदस्या हिना ००मुलानी, माजी उपसरपंच सुभाष पवार, माजी उपसरपंच कविता पवार, माजी उपसरपंच रुपाली करवंदे, माजी उपसरपंच प्रणाली आगिवले. निवडणूक प्रक्रियेच्या वेळी उपस्थित होते.

मावळचे आमदार सुनिल शेकळे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्यासह अन्य मानयवरांनी जागेश्वर यांचे अभिनंदन केले.

भाजपा टाकवे वडेश्वर गट अध्यक्ष रोहिदास  असवले  म्हणाले ,”  या ग्रामपंचायतीत भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व आहे . स्थानिक पातळीवर  पक्षीय भेदाभेद न मानता राष्ट्रवादीचे  असलेल्या सदस्य ला उपसरपंच  पदाची संधी मिळाली.

सर्व सदस्यांनी राजकारण न पाहता  गावच्या विकासाकडे लक्ष देणे  महत्त्वाचे समजले व प्रत्येकाला उपसरपंच होण्याची संधी दिली.  त्यामध्ये राष्ट्रवादीचे असलेले बुधाजी जागेश्वर यांना देखील उपसरपंच होण्याचा मान मिळवून दिला. या  घडामोडीमुळे या ग्रामपंचायतीचा सर्व मावळ तालुक्यातील  ग्रामपंचायत तिने आदर्श घेणे गरजेचे आहे.

पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस युवक उपअध्यक्ष बाबाजी गायकवाड, उद्योजक संतोष जाचक, प्रसिद्ध गाडा मालक नंदू शेठ असवले, गोपाळ पवळे, अमोल आगिवले, हरिभाऊ पवळे, युवराज पवळे, तुकाराम कोद्रे, रोहिदास जांभुळकर ,माजी ग्रामपंचायत सदस्य आतिश मोरे,पराग सावंत, काशिनाथ जांभूळकर, भगवान लोंढे, योगेश पवळे, समाधान पवळे, रमेश जाधव, गोपीचंद महाराज कचरे,माजी उपसरपंच नवनाथ मोढवे, रवी पवार, राष्ट्रवादीचे जेष्ठ कार्यकर्ते दिगंबर आगिवले, सचिन पालवे, विनायक कल्हाटकर, नवनाथ कल्हाटकर, सरपंच भिकाजी भागवत, शिवाजी जांभुळकर, गणेश महाराज जांभळे, पुणे जिल्हा सह्याद्री प्रतिष्ठान माजी अध्यक्ष सदानंद पिलाने,  उद्योजक प्रकाश करवंदे, प्रसिद्ध गाडा मालक विलास असवले, शंकर आवारी,  बाळू भोईरकर, लक्ष्मण चोरघे, माजी सरपंच सुरेश चोरघे, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष सोमनाथ चोरघे  शशिकांत कराळे, रोहिदास खुरुसुले, सागर भोईरकर,ताराबाई पवळे, सावित्रीबाई जोगेश्वर, प्रमिला पवळे, यशोदा सावंत, वैशाली जागेश्वर, संगीता पवळे, रोहिणी नंबरे , विलास पवळे. यांसह गावातील सर्व माता-पिता बंधू भगिनी, मित्र परिवार व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी डीजेच्या गजरात  मिरवणूक काढून संपूर्ण गावांमध्ये गुलाल भंडार उधळून  मिरवणूक काढण्यात आली आनंद  जल्लोष साजरा करून अनेक मान्यवरांनी  भेटी देऊन नुकतेच उपसरपंच झालेले बुधाजी गुणाजी जागेश्वर यांचे अभिनंदन केले. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!