मुंबई:
भामा आसखेड धरणग्रस्तांचे आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे उपोषण आंदोलन सुरूच आहे.अद्यापही धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागले नाही.आमचे प्रश्न मार्गी लागत नाही तो पर्यत हा लढा असाच चालू ठेवण्याचा निर्धार अंदोलनकर्त्यांनी केला आहे.

विधान परिषदेचे आमदार  सचिन आहीर  यांनी भामा आसखेड धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला भेट देऊन धरणग्रस्तांचे प्रश्न लक्षवेधीमध्ये मांडले. मुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन यासंदर्भात लवकरच निर्णय घेऊन असे आश्वासन दिले .परंतु या संदर्भात धरणग्रस्त शिष्टमंडळाशी अजून कोणतेही चर्चा झाली नाही.

जोपर्यंत प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना जमीन वाटप होत नाही तथा शेतकऱ्यांच्या नावावरती जिल्हा पुनर्वसन विभाग पुणे यांच्याकडून सातबारा करत नाही तोपर्यंत धरणग्रस्तांचे धरणे उपोषण आंदोलन हे बेमुदत चालू राहणार आहे. जर महाराष्ट्र शासन आंदोलनाची दखल घेत नसेल तर धरणग्रस्त शेतकरी आक्रमक होऊन मंत्रालयात घुसून आंदोलन करतील असा इशारा  धरणग्रस्तांचे प्रमुख  सत्यवान नवले, देवदास बांदल  यांनी दिला.

१६  दिवसापासून  आझाद मैदानावर धरणे आंदोलनात  धरणग्रस्त शेतकरी  शंकर साबळे ,काळुराम गडदे , सुभाष तळेकर , रावजी मोहन  आंदोलनात सहभागी आहेत.

error: Content is protected !!