पिंपळोली:
येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. गावातील साठ वर्षां पुढील ज्येष्ठ महिलांचा सन्मान करण्यात आला.महिलांच्या स्पर्धा घेण्यात आल्या.बहुसंख्येने महिलांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक जनाबाई रोहिदास मिंडे यांनी पटकावला . दुसरा क्रमांक हिराबाई विष्णू घोगरे यांनी पटकावला. तिसरा क्रमांक वत्सला मारुती गुजर यांनी पटकावला. महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन सर्व बचत गटांनी केले होते.

सरपंच  निलम सुतार तसेच ग्रामपंचायत सदस् रेश्मा गायकवाड,  ग्रामपंचायत सदस्य सिद्धार्थ चौरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन मुक्ताबाई  बोंबले (अंगणवाडी शिक्षिका,) वत्सला गुजर (मदतनीस,) सारिका पिंपळे, स्वप्न बोंबले (आशा वर्कर,) रूपाली चौरे ,सुषमा पिंपळे, सुरेखा करवंदे, सखुबाई बोंबले, राष्ट्रवादीच्या नाणे मावळ संघटक प्रमिला बोंबले यांच्यासह अन्य महिलांनी केले होते.

प्रमिला गोरख बोंबले (नाणे मावळ संघटक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) यांनी दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस तसेच लकी ड्रॉसाठी २४  बक्षीसांचे नियोजन केले. प्रथम क्रमांक स्वप्न संतोष बोंबले यांच्याकडून बक्षीस देण्यात आले.

संभाजी धोंडू बोंबले, मच्छिंद्र गुजर,  मुख्याध्यापक श्रीकांत दळवी यांचे विशेष सहकार्य लाभले.

error: Content is protected !!