वडगाव मावळ:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी जातीवाचक आणि अपमानास्पद वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा मावळ तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. गांधी यांनी देशाची माफी मागावी यसाठी माफी मागो आंदोलन करण्यात आले.
या वेळी जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे,मा.सभापती गुलाबकाका म्हाळसकर,मा.नगरसेवक अरुण भेगडे,संघटनमंत्री किरण राक्षे,सरचिटणीस सुनील चव्हाण,वडगाव शहर अध्यक्ष अनंता कुडे,लोणावळा शहर अध्यक्ष रामविलास खंडेलवाल,देहूरोड शहर अध्यक्ष बाळासाहेब शेलार,पुणे जिल्हा युवा मोर्चा कार्याध्यक्ष बाळासाहेब घोटकुले,मावळ तालुका युवा मोर्चा कार्याध्यक्ष गणेश ठाकर,विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे,सोशल मीडिया अध्यक्ष सागर शिंदे,संचालक सुर्यकांत सोरटे, अं.मा.वि.आघाडी अध्यक्ष विठ्ठल तुर्डे, यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांंनी जोरदार घोषणाबाजी केली.काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपाने केली.