करुणा परमेश्वरी वरदान
सकाळची प्रसन्न वेळ होती “आम्ही स्वच्छ शाळा सुंदर शाळा” या प्रकल्पासाठी लायन्स क्लब तळेगाव चे सर्व सभासद सर्व शाळांना भेटी देत स्टेशनवरच्या नगरपालिकेच्या शाळेत पोहोचलो.
वर्ग तपासता तपासता तिसरीच्या वर्गात गेल्यानंतर तेथील कांबळे गुरुजींनी एका विद्यार्थ्याला माझ्यासमोर उभ केलं! तो पोलिओग्रस्त असल्यामुळे एका चिंचेच्या झाडाच्या फांदीच्या आधाराने आमच्यासमोर उभा राहिला.
कांबळे सरांनी त्याची हकीकत सांगायला सुरुवात केली ते म्हणाले डॉक्टर साहेब__ हा बाळु घोरपडे त्याचे वडील एका कारागिराच्या हाताखाली बांधकामाच्या मजुरीचे काम करतात. घरात चार खाणारी तोंड उत्पन्न रोजचा खर्च न परवडणारा त्यामुळे गरिबीचे चटके इतके आहेत की या पोलिओ ने अपंग झालेल्या मुलाला उभं राहण्यासाठी एक चांगली काठी सुद्धा ते विकत घेऊ शकत नाहीत.
डॉक्टर साहेब त्याच्यासाठी आपल्याला काही करता आलं तर बघा ना! आपण स्वतः डॉक्टर आहात लायन्स क्लबच्या माध्यमातून त्याच्यावर काहीतरी उपचार करून त्याची व्याधी दूर करता आली तर त्याचं जीवन सुधारेल आणि आपल्या सर्वांच्या हातून एक पुण्याचं काम घडेल असं मला वाटतं!
मित्रांनो ,कांबळे सर यांच्या नजरेतून मुखातून येणाऱ्या प्रत्येक शब्दातून त्या बाळु घोरपडे विषयीची त्यांना वाटणारी करुणा मी प्रत्यक्ष अनुभवली कारण ती माझ्या मनाला भिडणारी होती आणि त्या क्षणी त्या मुलांसाठी काही करता आलं तर निश्चितच आपण केलं पाहिजे हा ध्यास मी मनाशी धरला.
त्या मानसिक अवस्थेतून प्रेरित होऊन मी दुसऱ्या दिवशी माझे गुरु पद्मविभूषण डॉक्टर के एच संचेती सरांशी फोनवरून संपर्क साधला आणि त्यांना बाळु घोरपडे विषयीची पूर्ण कल्पना दिली! एवढेच नव्हे तर त्याच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव सुद्धा माझ्या शब्दातून व्यक्त केली.माझा दूरध्वनी आणि पत्र वाचल्यानंतर संचेती सरांनी त्याला त्याच दिवशी आपल्या अद्ययावत अशा संचेती हॉस्पिटल मध्ये दाखल करून घेतलं व योग्य उपचारांना सुरुवात केली.
संचेती हॉस्पिटल मधून डिस्चार्ज घेण्याच्या आदल्या दिवशी बाळु घोरपडे यांचे वडील माझ्याकडे आले त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या मुलाला गेले दीड महिना दिलेली ट्रीटमेंट व त्यासाठी आलेला बिलाचा खर्च हा कसा भरावा याची चिंता मला दिसत होती. बाळू घोरपडे च डिस्चार्ज कार्ड आणि त्या सोबत असलेलं संचेती हॉस्पिटल बिल मी पाहिल्यानंतर गुरुवर्य डॉक्टर संचेती सरांशी मी दूरध्वनीवरून संपर्क साधला.
सरांना या गरीब विद्यार्थ्यांच्या औषधोपचाराचा खर्च पूर्ण माफ करावा अशी त्यांना कळकळीची विनंती केली! आणि अपेक्षेप्रमाणे दुसऱ्या दिवशी मला सुखद धक्का बसला तो असा की— माझ्या हॉस्पिटल च्या दारामध्ये संचिती हॉस्पिटल ची रुग्णवाहिका उभी होती त्यात बाळु घोरपडे त्याचे वडील एक डॉक्टर एक महिन्याचं पूर्ण औषध असा सर्व लवाजमा होता.
मी उत्सुकतेने बाळू घोरपडे यांच्या वडिलांना विचारलं की आपण हॉस्पिटल च्या बिलाचं काय केलं? यावरून बाळु घोरपडे ते वडील मला म्हणाले कि डॉक्टर साहेब सरांनी बिल तर सोडाच पण पुढील एक महिन्याच औषध व यापुढील सर्व उपचार ते मोफत करतील असं मला त्यांनी आश्वासन दिलं! असं उत्तर अत्यंत कृतज्ञतापूर्वक बाळूच्या वडिलांनी मला सांगितलं.
( शब्दांकन-डाॅ.शाळिग्राम भंडारी)
- आमदार सुनिल शेळके यांना मंत्रीमंडळात संधी द्यावी :नाणोलीकरांचे फिरंगाई मातेला साकडे
- बाळासाहेब ढोरे यांचे निधन
- शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियानात शाळांनी सहभागी व्हावे: राजेश गायकवाड
- विद्या प्रसारिणी सभेचा प्रथम क्रमांकाच्या उत्कृष्ट प्रकल्प पुरस्काराने श्री.बाळासाहेब खेडकर सन्मानित
- कान्हेत दिव्यांग दिन उत्साहात साजरा