इंदोरी:
इंदोरीत चैतन्य इंटरनॅशनल स्कूल मध्ये (CBSE)   येथे योगः कर्मसु कौशलम्‌ या उद्देशाने खास  शिक्षकासाठी योग वर्गाचे  आयोजन करण्यात आले.

चैतन्य चॅरिटेबल फाउंडेशन संचलित चैतन्य इंटरनॅशनल स्कूल (CBSE) मध्ये ‘योग व जीवनातील ताणतणावाचे व्यवस्थापन”    ह्या विषयावर शिक्षकांसाठी योग वर्गाचे  आयोजन करण्यात आले होते.  या योग वर्गाला  मार्गदर्शन करण्यासाठी शिवयोग विज्ञान संस्थेचे संस्थापक श्री भोसले गुरुजी उपस्थित होते .

शिक्षक हा विद्यार्थ्यांना घडवणारा महत्त्वाचा घटक आहे, त्याचे आरोग्य आणि मनस्थिती जर सुदृढ असेल तरच त्यांच्याहातून ज्ञानदानाचे कार्य सु व्यवस्थित घडेल .या कामी योग साधने द्वारे शिक्षकांनी स्वतःला कशाप्रकारे तयार केले पाहिजे याचे प्रशिक्षण देण्यात आले. 

या योग वर्गाचे आयोजन  चैतन्य इंटरनॅशनल स्कूल (CBSE) , इंदुरी चे संस्थापक व  अध्यक्ष मा. श्री. भगवान शेवकरजी  यांनी केले होते या योग शाळेमध्ये मावळ तालुक्यातील अनेक शाळेतील शिक्षकांनी सहभाग घेतला होत.

error: Content is protected !!