येळसे गावात विज पडून जनावरांना साठवून ठेवलेला चारा जळून खाक.तर पवनमावळ परिसरात आवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
नुकसान झालेल्या रोपांचा पंचनामा करा
पवनानगरमावळ तालुक्यात (दि.१६ मार्च)झालेल्या आवकाळी पाऊस,वाऱ्या सह विजेच्या कडकटात मोठ्या प्रमाणावर आवकाळी पावसाने हजेरी लावली.यामध्ये येळसे गावातील शेतकरी सुभाष खंडू कडू यांच्या शेतातील जनावरांनसाठी साठवून ठेवलेल्या गुरांच्या चाऱ्यावर विज पडून चारा भसमसात झाला आहे.

तसेच पवनमावळ भागातील गहु,हरभारा,काकडी,टोमॅटो, ज्वारी,बाजरी,भुईमूग पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.अचानक झालेल्या आवकाळी पावस,वारा तसेच विजेचा कडकडाटात झाल्याने मोठ्या प्रमाणावर शेतामध्ये पाणी साठून राहिले आहे.रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याने बळीराजाच्या संकटात भर पडली आहे.आवकाळी पावसामुळे मावळ तालुक्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.

शेतकर्‍यांवर अस्मानी संकट कोसळले असून, या संकटाची साधी पुष्टीसुद्धा करण्यास अद्याप शासनाचा एकही माणूस शेतकर्‍याच्या बांधावर गेला नाही, तर झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास कधी येतील? असा प्रश्‍न पडला असताना येळसे, काले,कोथुर्णे,शिवली,महागांव, कडधे,करुंज,शिवणे,बौर,वारु,आर्डव,मळवंडी,आढे,सडवली,औझर्डे,सडवली,उर्से या भागातील रब्बी हंगामातील पिकांच्या शेतीत पाणी साचून राहिल्याने रब्बी पिकांचे क्षेत्र संकटात आले आहे.

त्यामुळे आमच्या पिकांचे नुकसान आमच्या डोळ्यासमोर दिसत आहे.यामुळे शासनाने लवकरात लवकर रब्बी पिकांचे नुसकानीचे पंचनामे करावे अशी मागणी शेतकरी करत आहे.
सुभाष कडू शेतकरी म्हणाले,”
गुरुवारी झालेल्या आवकाळी पावसामुळे मी जनावरांसाठी साठवून ठेवलेल्या चाऱ्यावर विज कोसळून चाऱ्याला आग लागून संपुर्ण चारा जळून गेला आहे. तसेच गहु,काकडी,मका व टोमॅटो पिकांचे मुठे नुसकान झाले आहे. गहु अजुन दोन आठवड्यात काढणीला आला होता तर टोमॅटो ला फुले लागली होती पावसामुळे सर्व फुले गळाली असल्याने आतातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. तरी शासनाने लवकरात लवकर पंचनामे करावे.

error: Content is protected !!