
मित्रांनो नमस्कार –“संत कृपा झाली- इमारत फळा आली!”– खरोखरच या संतांच्या सहवासाने आपल्या व्यक्तिमत्वात किंबहुना आपल्या संपूर्ण आयुष्यात बदल होतो! एक संत-महात्मे– तीर्थयात्रा करून एका ठरलेल्या गावी निघाले होते!
निर्मनुष्य रस्ता होता! आजूबाजूला फारशी वस्ती दिसत नव्हती! त्या महात्म्याला खूप तहान लागली होती! आपली तहान भागवण्यासाठी ते जवळपासच्या वस्तीचा शोध घेत होते! तितक्यात त्यांना एक सर्वसाधारण घर दिसलं! त्या घरात प्रवेश करून महाराजांनी नम्रतापूर्वक घराच्या मालकाकडे पाणी मागितल!
ते घर एका कुंभारदादाच होतं त्यामुळे घरात मातीपासून तयार केलेल्या अनेक वस्तू अतिशय उत्तम स्वरूपात रचलेल्या होत्या त्यामुळे घराला खूप शोभा आलेली होती! पाणी पिता पिता महाराजांचं लक्ष घराच्या एका कोपर्यात ठेवलेल्या मक्याकडे गेलं! त्या मडक्याकडे पाहून महाराज त्या कुंभार दादाला म्हणाले की –हे अस एकटच मडकं तू बाजूला का ठेवल आहेस?
– त्यावर कुंभारदादा म्हणाला– महाराज हे मडकं नीट भाजलं नसल्यामुळे त्याला गळती लागली आहे म्हणून ते वेगळ ठेवल आहे! तसं मी त्याला विकणारही नाही कारण ते कोणीही घेणार नाही! त्यावर महात्मा त्या कुंभारदादाला म्हणाले की -मला ते मडके दे! महाराजांना कुंभार नम्रतेने म्हणाला- महाराज मी त्यापेक्षा तुम्हाला एक चांगल सुंदर असं मडक देतो!
–
पण महाराज हट्टालाच पेटले होते म्हणून ते म्हणाले की –हेबघ बाबा तू जर मला मडक देणार असशील_ तर मला हेच गळक मडक दे! अगदी नाईलाजाने त्या कुंभार दादाने ते मडक महाराजांच्या हवाली केलं! ते गळक मडक घेऊन महात्मा ठरलेल्या गावी पोहोचले! मित्रांनो त्या गावात- संपूर्ण गावाची श्रद्धा असलेल एक सुंदर मंदिर होतं! त्यातील मुख्य मूर्तीवर महाराजांनी ते मडकं बांधलं- त्यात पाणी भरलं!
मडकं गळक असल्यामुळे मडक्यातून मूर्तीवर आपोआपच अभिषेक सुरू झाला! रोज दर्शनाला येणारे भाविक अत्यंत मनोभावे त्या मूर्तीला नमस्कार करायचे आणि त्यानंतर त्या गळक्या मडक्यापुढे नतमस्तक व्हायचे! मित्रांनो– या छोट्याशा गोष्टीतून आपल्या असं लक्षात आलं असेल की– एका कोपऱ्यात खितपत पडलेल्या त्या मडक्याला सुद्धा संतांच्या स्पर्शाने देवत्व प्राप्त झालं! मित्रांनो हेच तत्व आपल्याही आयुष्याला लागू पडतं! त्यासाठी संत महात्म्यांचा सहवास ज्यांना लाभला.
त्यांच्या आयुष्याचं सोनं होतं! मला वाटतं आपण हाच संदेश घेऊन– सुसंगती सदा घडो- सुजन वाक्य कानी पडो! कलंक मतीचा झडो- विषय सर्वथा ना आवडो!!–हे रामदास स्वामींनी साडेतीनशे वर्षांपूर्वी आपल्या मनाच्या श्लोकांत जे म्हटलं होतं ते -जर आपण प्रत्यक्ष आपल्या कृतीत आणल तर निश्चितच अर्थपूर्ण जीवनाची गुरुकिल्ली आपल्याला गवसेल असं मला वाटतं!
( शब्दांकन- डॉ.शाळीग्राम भंडारी तळेगाव दाभाडे)
- महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे: डॉ. ज्योती मेहता
- ‘ धामणेत टाळ, विणा, मृदुगांचा गजर आणि विठ्ठल नामाचा जयघोष ‘
- इंदोरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बेबीताई बैकर बिनविरोध
- कामशेतला महिला मेळावा व गुणगौरव सोहळा उत्साहात
- सुरेल गीतांनी छेडली श्रोत्यांच्या हृदयाची तार



