शिलाटणे येथील जखमी शिवभक्ताचा उपचारादरम्यान मृत्यू
शिलाटणे सह मावळ तालुक्यात  पसरली शोककळा
कार्ला- 
दिनांक 10 मार्च (शुक्रवार) रोजी तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यासाठी किल्ले मल्हारगड इथून शिवज्योत घेऊन मावळ तालुक्यातील  शिलाटणे गावातील  शिवभक्त परतीच्या मार्गावर असताना रावेत ताथवडे जवळ त्यांच्या वाहनाचा अपघात झाला होता.

या अपघातात शिलाटणे  गावातील एकूण 33 शिवभक्त जखमी झाले होते. त्यापैकी एका १२  वर्षीय शिवभक्ताचा आज (गुरुवार, दिनांक १६ मार्च) रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.कु आर्यन सोमनाथ कोंढभर (वय 12) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्या शिवभक्ताचे नाव आहे. सदर अपघातात आर्यन गंभीर जखमी झाला होता.

त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र आज दुपारच्या सुमारास रावेत येथील ओजस हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. चिमुकल्याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली आणि संपूर्ण मावळ तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

error: Content is protected !!