मित्रांनो लहानपणी,
प्रयत्नांची पराकाष्टा!तसेच प्रयत्नांती परमेश्वर– अशा अनेक म्हणी आपल्याला कार्य प्रवृत्त करण्यासाठी शिकवल्या जातात! यासाठी आयुष्याची काही मर्यादा आहे का? या प्रयत्नांच आपल्या आयुष्यात किती आणि कसं स्थान आहे?
आयुष्यातील प्रत्येक क्षण किती मोलाचा आहे?- हाच आपल्या आजच्या चिंतनाचा विषय आहे!”* चला तर मग या संदर्भातच प्रत्यक्ष आपण संवाद साधूया–_मित्रांनो मानवी जीवनाचे अनेक टप्पे आहेत त्यात *पूर्वार्ध* आणि *उत्तरार्ध* आहे.
उत्तरार्धात कित्येक वेळा असं वाटतं की, जगण्याच्या धावपळीत काही गोष्टी आपल्या करायच्या राहून गेल्या ह्या पूर्वार्धात ठरवलेले आहेत त्यावर हळ हळ करण्या पेक्षा आपण वास्तवाला सामोरे जाऊन आपलं भविष्य अधिक सुंदर समृद्ध कस करता येईल याचा आज आपण विचार करण आवश्यक आहे.
कारण काही व्यक्ती साठी सत्तरी ओलांडल्यावर वरही विद्यापीठाची उच्च पदवी संपादन करणारे हे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना पाहिलं त्यांच्या उत्साहाला आपल्याला सलाम करावासा वाटतो, पण त्यासाठी आपल्या मनाचा निर्धार हवा… कारण बहुतेक मंडळी *”ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान”* असाच विचार करून ते आपलं निष्क्रीय जीवन जगत असतात.
त्यावर एकच रामबाण उपाय म्हणजे *आपण आळस झटकल्याशिवाय जीवन मंदिरावर यशाचा कळस आपल्याला कधीच गाठता येणार नाही* निसर्गात मित्रांनो आपल्याला झाडाची फळे दिसतात पण जमिनीत खोल गेलेली त्यांची मुळे दिसत नाहीत.
असंच एक मूर्तिमंत उदाहरण द्यायचं म्हणजे बहिरेवाडी नावाच्या खेड्यातील एक उत्साही तरुण वेद गंगेच्या काठी गारगोटी येथे ज्ञानगंगा पोहोचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो हा तरुण म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून *”शिक्षण महर्षी डॉक्टर जे पी नाईक”* हे स्वतः वयाच्या सहाव्या वर्षी शिकवण्या घेत घेत ते शिकले.
दारिद्रशी झगडले, त्यानंतर स्वातंत्र्याच्या चळवळीत उतरले, तुरुंगात गेले त्यानंतर त्यांना त्वचारोग झालेल्या रुग्णांच्या त्यांनी केलेल्या उपचाराबद्दल इंग्रजांनी त्यांना तुरुंगवासात विशेष सूट दिली. त्यानंतर या ध्येयवेड्या या माणसाने वैद्यकीय क्षेत्रातील पुस्तकांची मागणी केली आणि तुरुंगातून सुटल्यावर आपल्या अभ्यासाचा उपयोग करून धारवाड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात त्वच्या रोगग्रस्त गावाला रोगमुक्त करून गावकऱ्यांच्या सहकार्यातून स्वच्छता आणि साक्षरतेच प्रमाण वाढवलं, एवढेच नव्हे तर डोंगर पोखरून त्या गावाला थेट शहराच्या बाजारपेठेत जोडणारा रस्ता त्यांनी तयार केला.
हा रस्ता तयार करण्यासाठी त्यांनी बऱ्याच खस्ता खाल्ल्या त्यांनी धारवाडच्या ग्रंथालयात बैठक मारून त्यांनी अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम आपल्या उतारवयातही पूर्ण केला सरकारने त्यांना ग्रामसुधार हे पद देऊन त्यांचं कौतुक केलं. मित्रांनो, माणूस स्वतःला व इतरांना सुद्धा एक शक्ती देत असतो याचं हे जिवंत आणि बोलकं उदाहरण आहे.
आपल्या आयुष्याच्या पूर्वार्धात जरी आपल्याला फारसं काही करता आलं नाही , तरी उत्तरार्धातील आपलं आयुष्य, यश आणि कर्तुत्वान उजळून निघू शकत… हाच आपला आजचा चिंतनाचा विषय आहे, तो आपल्या पर्यंत पोहोचला म्हणून आज येथेच थांबतो.
(शब्दांकन-ला.डॉ. शाळीग्राम भंडारी)
- आमदार सुनिल शेळके यांना मंत्रीमंडळात संधी द्यावी :नाणोलीकरांचे फिरंगाई मातेला साकडे
- बाळासाहेब ढोरे यांचे निधन
- शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियानात शाळांनी सहभागी व्हावे: राजेश गायकवाड
- विद्या प्रसारिणी सभेचा प्रथम क्रमांकाच्या उत्कृष्ट प्रकल्प पुरस्काराने श्री.बाळासाहेब खेडकर सन्मानित
- कान्हेत दिव्यांग दिन उत्साहात साजरा