भायखळ्यात गुढीपाडवा “शोभायात्रा” निघणार
मुंबई:
दोन वर्षानंतर या वर्षा भायखळ्यात गुढिपाडवा “शोभायात्रा” निघणा आहे. ही मिरवणूक मुंबईतील गुढीपाडव्याच्या सणाचे महत्त्वाचे आकर्षण असते. शोभायात्रा सकाळी साधारण ९ वाजता मंदार निकेतन इमारतीच्या पटांगणा पासुन सुरू होऊन दुपार २ वाजे पर्यंत चालते.

ही शोभायात्रा भायखळा स्टेशन (प) पासून ना. म. जोशी मार्गाने मॅनेजमेन्ट गुरू कै.गंगाराम तळेकर चौकातून कॅा. गणाचार्य चौकात येते (चिंचपोकळी-प) येथुन पुन्हा ती आल्या मार्गाने माघारी येते व भायखळा स्टेशन (प) येथे येते संपते ही शोभायात्रा पाहण्यासाठी गिरणगावातील लोक मोठ्या संख्येने येतात. ‘गुढीपाडवा’ (Gudi Padwa) हा मराठी लोकांसाठी नवीन वर्षाचा शुभारंभ आहे.

हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे तसेच साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्व आहे. यंदा गुढीपाडवा २२ मार्च रोजी साजरा होणार आहे. गुढीपाडव्याच्या आधी अनेक दिवस नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू होते. घराची साफसफाई केली जाते,

घर तोरण आणि रांगोळ्यांनी सजवले जाते. या दिवशी गुडीला खास पुरणपोळीचा नैवैद्य दाखवला जातो. गुडीपाडव्याला संपूर्ण राज्यात महाराष्ट्राच्या संस्कृतीचे आणि परंपरेचे दर्शन घडते. तसेच दर्शन भायखळ्याच्या गुढिपाडवा शोभा यात्रेत होणार आहे या वर्षी शोभा यात्रेच् आकर्षण “ आई एकवीरा” पालखी सोहळा आयोजीत केला आहे. 

या शोभायात्रेत पुरूष मंडळी मराठमोळी पारंपारिक वेशभूषा करतात तर महिला नऊवारी साड्या नेसून, फेटे बांधून, नथ घालून सहभागी होतात गेली दोन वर्षे कोरोनामुळे शोभा यात्रेला बंदी होती. मात्र आता या वर्षा भायखळ्यात ना.म. जोशी मार्गावर पुन्हा शोभा यात्रेची धूम पहायला मिळणार आहे.

मंदार निकेतन उत्सव मंडळ सामाजिक जबाबदारीचाची जाणीव ठेवते या जाणीवे मधुनच दरवर्षी मंडळ रक्तदान शिबार आयोजीत करते या वर्षा सुध्दा मंडळाने रक्तदान शिबीराचे दिनांक १९ रविवार रोजी सकाळी १० वाजता ईमारतीच्या पटांगणात आयोजन केले केले आहे मंडळांचे कार्यकर्ते व भायखळ्या मधिल जनता शिबीरात मोठ्या प्रमाणात रक्तदान करते,या शोभायात्रेत सर्वानी सहभागी व्हावे असे आवाहन सुभाष गंगाराम तळेकर  अध्यकमंदार निकेतन उत्सव मंडळ .(भायखळ्याचा गुढी पाडवा) यांनी केले.

error: Content is protected !!