तळेगाव दाभाडे :
येथील सेवाभावी वृत्तीने काम करणा-या’ धर्मवीर संभाजी प्रतिष्ठान’ च्या वतीने महिला दिनाची औचित्य साधून समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.
महिलांचा सन्मान व्हावा, गौरव व्हावा, याची समाजाने नोंद घ्यावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानच्यावतीने नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित नवीन समर्थ विद्यालय तळेगाव दाभाडे या विद्यालयातील जेष्ठ अध्यापिका कमल दशरथ ढमढेर यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराने* सन्मानित करण्यात आले .
सुशीला मंगल कार्यालय तळेगाव दाभाडे येथे या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते .नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांनी ढमढेरे यांचे अभिनंदन केले तसेच पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस