
तळेगाव दाभाडे:
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कु.रुपाली प्रदीप जव्हेरी यांनी आपल्या निवास्थानी राजामाता जिजाऊ यांची अतिशय चांगली रांगोळी काढली असून ती पहाण्यासाठी अनेकांनी त्यांच्या घरी भेटी दिल्या.
सुमारे ८ तास एकाटीने प्रयत्न करून राजमाता जिजाऊ यांची हुबेहूब रांगोळी तिने साकारली आहे. या आगोदर प्रकट दिनाच्या दिवशी स्वामी समर्थ, शिवरात्रीच्या दिवशी श्री शंकर,पार्वती, डोळसनाथ उत्सवाचे दिवशी श्री डोळसनाथ महाराज यांची रांगोळी तिने वेळोवेळी काढली आहे.
तिने दहावी पर्यंत शिक्षण घेतल्या नंतर पोट्रेटचा कोर्स पूर्ण केला आहे. परिसरामध्ये शुभ कार्याच्या प्रसंगी रांगोळी काढण्यासाठी तिला बोलाविले जाते. व ती त्या घरी रांगोळी काढून त्या परिवाराचा आनंद व्दिगुणित करते. तिच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
- महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे: डॉ. ज्योती मेहता
- ‘ धामणेत टाळ, विणा, मृदुगांचा गजर आणि विठ्ठल नामाचा जयघोष ‘
- इंदोरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बेबीताई बैकर बिनविरोध
- कामशेतला महिला मेळावा व गुणगौरव सोहळा उत्साहात
- सुरेल गीतांनी छेडली श्रोत्यांच्या हृदयाची तार



