तळेगाव पोलिसांनी आयआरबीचे प्रवक्ते बनू नये: मिलिंद अच्युत
तळेगाव दाभाडे:
तळेगाव दाभाडे पोलिसांनी IRB कंपनीचे प्रवक्ते बनू नये , असे स्पष्ट मत सामाजिक कार्यकर्ते मिलिंद अच्युत यांनी व्यक्त केले आहे.
मिलींद अच्युत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,”
सोमटणे टोल नाका हटाव कृती समितीच्या वतीने तळेगाव बंद चे आवाहन केल्यानंतर कडकडीत तळेगाव बंद पाळण्यात आला. सर्वच स्तरातून टोल हटाव कृती समितीला पाठिंबा मिळत असल्यामुळे टोल नाका समर्थकांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.
त्यातच पोलीस यंत्रणांनी टोल हटाव कृती समितीला नोटीस बजावून मा. न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्यामुळे कुठलेही आंदोलन करता येणार नाही तसेच आपण न्यायालयीन मार्गाचा अवलंब करावा असे निर्देश काढल्यामुळे पोलीस यंत्रणा जणू काही IRB कंपनीची प्रवक्ता असल्यासारखे वागत आहे असे मिलिंद अच्युत यांनी स्पष्ट केले.
मी स्वतः याचिका करता असल्यामुळे मूळ याचिका, वेगळ्याच विषयाची असून IRB व MSRDC वेगळ्याच विषयावरती पोलिसांचे लक्ष वेधत असून पोलीस देखील कुठलाही याचिकेबाबत अभ्यास न करता आंदोलन कर्त्याना नोटीस बजावत आहेत, सदर बाब गंभीर असून व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारी आहे.
मुळात मा. उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असणाऱ्या याचिकेचा पोलिस यंत्रणांनी अभ्यास करणे गरजेचे आहे, कारण याचिका ही वेगळ्याच विषयावरती अवलंबून असून, आंदोलनकर्त्यांनी वेगळ्याच विषयावरती आंदोलन केले आहे, यामुळे नोटीस बजावताना पोलीस यंत्रणांनी भान राखणे गरजेचे आहे असल्याचे मत मिलिंद अच्युत यांनी व्यक्त केले आहे.
टोल नाका हटाव कृती समितीच्या वतीने किशोर आवारे यांनी सुरू केलेले आंदोलन टोल नका समर्थकांनी दडपण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही जोपर्यंत सत्य जनतेसमोर येत नाही तोपर्यंत किशोर आवारे कुठल्याही परिस्थितीमध्ये माघार घेणार नसून, तळेगावचा टोलनाक्या विरोधातील बंड, हा जनतेचा बंड असून उद्या मावळ तालुक्यातील जनताच सोमटणे टोल नाका बंद करेल असा विश्वास मिलिंद अच्युत यांनी व्यक्त केला.
भारत सरकारच्या राजपत्रानुसार सोमाटणे टोल नाका हा देहूरोड येथे अपेक्षित होता परंतु iRB व MSRDC च्या धूर्तपणामुळे केंद्र सरकारला फसवून सदर टोल नाका कुठलीही परवानगी न घेता तळेगाव हद्दीमध्ये उभारण्यात आला आहे, सदर प्रक्रिया ही नियमबाह्य व अवैध असल्यामुळे प्रथमतः पोलिसांनी सुनील उर्फ मुन्ना मोरे यांच्या तक्रारीनुसार MSRDC महाराष्ट्र राज्य यांच्या विरोधात केंद्र सरकारच्या राज पत्राचा अवमान केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करणे अपेक्षित असून टोलनाक्या विरोधातील आंदोलने चुकीच्या माहितीच्या आधारे दडपू नये असा सल्ला मिलिंद अच्युत यांनी दिला आहे.