सुदुंबरे:
सिद्धांत स्कूल ऑफ फार्मसी (वूमन) येथे जागतिक महिला दिवस अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात पार पडला. महाविद्यालयांत विद्यर्थिनी आणि प्राध्यापिकांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले  होते.

श्रद्धा आरोग्य केंद्राचे डॉ. लक्ष्मण कार्ले यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय पथक तपासणीसाठी महाविद्यालयांत उपस्थित होते. त्यांनी तपासणी करून विद्यार्थिनींना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात महिला सबलीकरण या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते.

प्रा. कल्पना अशोक गाडे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. सद्यस्थितीत राष्ट्र उभारणीच्या कार्यात महिलांच्या योगदानाचे महत्त्व विषद केले. कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रात  विद्यार्थिनींनी पथनाट्य सादर केले. धनश्री शिंदे या विद्यार्थीनीनी आभार प्रदर्शन केले.

नियोजन प्रा. अबोली जोरी, प्रा. श्रेया गायकवाड आणि प्रा. मानसी हगवणे यांनी केले. प्राचार्य सागर कोरे यांनी कार्यक्रमाची रूपरेखा तयार केली. कार्यवाह श्री. मिहीर यादव आणि सौ. शनन यादव यांनी संस्थेच्या च्या वतीने सर्व उपस्थितांचे आभार मानले.

error: Content is protected !!