तळेगाव स्टेशन :ग
नवीन समर्थ विद्यालय येथे महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयातील सर्व अध्यापिका कार्यालयीन कर्मचारी महिला वर्ग यांच्यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयाचे प्राचार्य भाऊसाहेब वंजारे व पर्यवेक्षक रेवाप्पा शितोळे यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आले विद्यालयातील अध्यापक योगेश पाटील , युवराज रोंगटे श्री अरविंद नाईकरे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
यावेळी सर्व महिलांचे स्वागत गीताच्या तालासुरात करण्यात आले मान्यवरांच्या शुभहस्ते सरस्वती पूजन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक श्री शितोळे यांनी केले. सर्व महिला अध्यापिकांना पेन व पुष्प देऊन आदर सत्कार करण्यात आला
.महिला दिनाचे औचित्य साधून विद्यालयातील महिलांचा आनंद द्विगुणित करण्याच्या हेतूने संगीत खुर्चीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. विद्यालयातील जेष्ठ अध्यापिका वासंती काळोखे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. श्री संजय वंजारे यांनी अध्यक्ष मनोगतातून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अरविंद नाईकरे यांनी केले शिक्षक प्रतिनिधी सौ शारदा वाघमारे यांनी आभार मानले.
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस