
तळेगाव दाभाडे:
पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या ( ग्रामीण)अध्यक्षपदी तळेगाव स्टेशन येथील विकी साहेबराव लोखंडे यांची निवड करण्यात आली.. सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयदेव आण्णा गायकवाड यांच्या हस्ते लोखंडे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष पंडित कांबळे, प्रदेश सामाजिक न्याय विभागातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
लोखंडे यांच्यावर मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे. तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेल्या प्रत्येक उपक्रमात लोखंडे यांचा सक्रीय सहभाग असतो.लोखंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांचे कट्टर समर्थक आहेत.
- कर्तृत्वाने मोठे होऊन चांगले वागा: देशमुख महाराज
- मोरया प्रतिष्ठानच्या वतीने वडगावात टँकरने मोफत पाणी पुरवठा
- शनिवारी वडगावमध्ये पोटोबा महाराजांचा उत्सव
- रिपब्लिकन पक्षाचे राज्यस्तरीय अभ्यास शिबीर कामशेत येथे संपन्न : रामदास आठवले यांनी केले मार्गदर्शन
- राज्यस्तरीय मंथन शिष्यवृत्ती परीक्षेत पैसाफंड शाळेचे यश



