चारित्र्य– एक चिंतन!
मित्रांनो,नमस्कार ! जिजाऊने छत्रपती शिवाजी महाराज यांना  रामायण-महाभारताच्या अनेक कथा सांगून त्यांच्यावर उत्तम संस्कार घडवले आणि शिवाजीराजे छत्रपती शिवाजी महाराज झालेत. इतकी क्षमता या कालातीत असणाऱ्या ग्रंथात आहेत.

चला तर मग रामायणातील एका पैलूवर आज आपण प्रकाश टाकूया– लंकाधिपती रावण हा दशग्रंथी ब्राह्मण होता. उच्चविद्याविभूषित होता. संपूर्ण सोन्याच्या लंकेचा अधिपती होता.प्रचंड शक्तिशाली असून शिवाचा निस्सिम भक्त होता. त्याच्या तुलनेत राजा राम काहीच नव्हते.

  रानावनात भटकणारा- राज वैभव- राजवस्त्र आणि सर्व परिवाराचा त्याग करून  अत्यंत खडतर प्रवास करणारा वनवासी होता तरीही त्यांचा विजय झाला! का?- का?– मित्रांनो, याच एकच उत्तर आहे ते म्हणजे चारित्र्यसंपन्न मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम!
 
मित्रांनो  ज्याला इंग्रजीत  कॅरेक्टर म्हणतात! प्रचंड बलशाली रावणाला युद्धात पराभव पत्करावा लागला कारण पतिव्रता असणाऱ्या सीतेचे त्याने हरण केलं! तिच्याकडे त्याने वाईट नजरेने बघितलं आणि तिथेच त्याच् चारित्र्यहनन झालं! मित्रांनो एक वेळ एखादा सद्गुण कमी असला तरी चालेल पण चारित्र्याला डाग लागता कामा नये.

कारण  चारित्र्य हे काचेच्या भांड्या सारख असतं त्याला जर तडा गेला तर ते परत साधता येत नाही ! मित्रांनो म्हणूनच आपल्या वैयक्तिक- कौटुंबिक- सामाजिक राजकीय क्षेत्रात स्त्रीने- पुरुषाने प्रत्येक पाऊल विचारपूर्वक ठेवुनच आपला जीवन प्रवास केला पाहिजे.

कारण वयाची पन्नास- साठ- सत्तर वर्षे ज्या चारित्र्यावर कुठेही डाग नव्हता तो केवळ एखाद्या क्षणाच्या मोहाला बळी पडून आपण आपलं धुतल्या तांदळासारख असणार  चारित्र्य गमावण्याची दुर्दैवाने आपल्यावर वेळ येऊ शकते.पण मित्रांनो हे केव्हा घडतं की– ज्यावेळी समाजाचा तोल ढळतो- तत्त्वांना ग्लानी येते- नीतीचा ऱ्हास होतो.

माणसाचा पशू होतो- तेव्हा समाजाला सावरणारा जर एखादा महात्मा प्रगटला तर आणि तरच हा अनर्थ  टळू शकतो– कारण त्या महात्म्याच्या पावलांनी तयार होणारी वाट- आपल्यासाठी नव्या जाणिवांची पहाट घेऊन येते! मित्रांनो आमच्या वैद्यकीय क्षेत्रात असं म्हटलं जातं की– प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर!- म्हणजे आजार होण्यापूर्वीच त्याला मुळासकट उपटून टाकलं पाहिजे.

तसंच अगदी तसंच काहीसं आपल्या चारित्र्याचं असत! कारण– एकदा का आपलं चारित्र्य हनन झाल की- मग परत ते आपल्यापाशी येऊ शकत नाही! मित्रांनो– इंग्रजीत एक म्हण आहे– व्हेन वेल्थ इज लॉस्ट- नथिंग इज लास्ट! व्हेन हेल्थ इज लॉस्ट -समथिंग इज लास्ट! बट व्हेन कॅरेक्टर इज लास्ट- एवरीथिंग इज लास्ट!– म्हणून मित्रांनो जाता जाता आपण एवढेच लक्षात ठेवू या.

आपलं चारित्र्य काचेच्या भांड्यासारखं असतं!  कुठल्याही मोहाला बळी न पडता आपल्या चारित्र्याची काळजी घेणं हाच आजचा आपला विषय होता तो आपल्यापर्यंत  पोहोचला म्हणून थांबतो.
( शब्दांकन- ला.डॉ. शाळीग्राम भंडारी,तळेगाव दाभाडे)

error: Content is protected !!