टाकवे बुद्रुक:
भोयरे ग्रामपंचायतीत विकास कामांना मिळाला बुस्टर डोस मिळाला आहे,असे म्हटले तरी वावगे ठरू नये. डिसेंबर महिन्यात ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली. आणि विकास कामांना निधीचा बुस्टर डोस घेऊन गाव प्रगतीपथावर असल्याचा विश्वास सरपंच वर्षा अमोल भोईरकर यांनी व्यक्त केला.

जानेवारीच्या  पहिल्या पंधरवडय़ात  ग्रामपंचायत सरपंच ,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य व अन्य पदाधिकारी यांनी  आदर्श ग्रामपंचायतीला भेट देऊन मार्गदर्शन घेतले. या
दौरा नंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली.त्यामध्ये प्रामुखाने संपूर्ण गावात बंदिस्त गटारे, स्मशानभूमी सुशोभीकरण, आरो प्लॅन्ट,महिलांसाठी धोबीघाट, पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी रेन हार्वेस्टिंग या कामांनी घोडदौड केला असल्याचे सरपंच भोईरकर यांनी सांगितले.

पिण्याच्या पाणीटाकीची रंगरंगोटी करण्यात आली, घनकचरा व्यवस्थापन सुरू झाले पर्यावरण संवर्धना वृक्ष लागवड करण्यात आली. वॉटर मिटर बसवण्यात आले. अंगणवाडी मुलांना शाळेचा ड्रेस वाटप झाले. महिलासांठी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला.आरोग्य शिबीर झाले.

स्वागत कमान,शाळांसाठी संरक्षक भिंत,विद्यार्थी केंद्र बिंदु मानून विविध शैक्षणिक मदत देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. गावातील विविध कामांची पाहणी गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांनी केली. नॅशनल पंचायत राज अपार्क स्पर्धेत भोयरे ग्रामपंचायतने भाग घेतला आहे.

भोयरे गावाला या पुढील कालावधीत गाव सुजलाम,सुफलाम करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सरपंच वर्षा अमोल भोईरकर यांनी सांगितले.

error: Content is protected !!