पवना शिक्षण संकुलात मराठी दिन उत्साहात साजरा
पवनानगर :
पवना शिक्षण संकुलातील पवना विद्या मंदिर व लायन्स शाता मानेक ज्युनिअर काँलेज मधील मराठी विभागाच्या वतिने मराठी भाषा दिन विविध कार्यक्रमाचे आयोजन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरवात ग्रंथदिडी काढून व कुसमाग्राज यांच्या प्रतिमेचे पुजन करुन झाली.यावेळी या ग्रंथदिडीचे पूजन पवना शिक्षण संकुलाचे प्रमुख प्राचार्य भाऊसाहेब आगळमे पर्यवेक्षिका निला केसकर,मराठी विभागाच्या रोशनी मरांडे,वैशाली वराडे,सांस्कृतिक विभाग प्रमुख सुनिल बोरुडे यांंच्याहस्ते करण्यात आले.
यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी मराठी दिनाचे औचित्य साधत वि वा शिरवाडकर यांच्या कविता व गीते नृत्य करत विद्यार्थांंनी व शिक्षकांनी सादर केली.
तसेच कै मिराबाई दशरथ भोंगाडे प्राथमिक विभागाच्या लहानमुलांनी देखील मराठी गीतावंर नृत्य सादर केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मराठी विभागाचे रोशनी मराडे,वैशाली वराडे ,राजकुमार वरघडे,बापुसाहेब पवार,गणेश ठोंबरे,छाया कर्डिले,मंजुषा गुजर,पल्लवी दुश्मन,सुवर्णा काळडोके,ज्योती कोंडभर,चैत्राली ठाकर ,मोहन शिंदे,संतोष टाकवे,संतोष ठाकर,धनश्री काळे,वृषाली भिडे,पुनम दुश्मन,एश्वर्या बुटाला,कांचन जाधव,स्वाती आडिवळे,रत्नमाला आडकर,सुप्रिया साठे,धनश्री वरघडे,उषा दळवी यांंच्यासह संकुलातील सर्व शिक्षक शिक्षेकेतर कर्मचा-यांनीप्रयत्न केले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक वैशाली वराडे यांनी तर सुत्रसंचालन अस्मिता कालेकर,वैष्णवी कुंभार यांनी तर आभार गणेश ठोंबरे यांनी मानले.
- महागाव येथे कालाष्टमी व श्री. काळभैरवनाथ जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
- इंदोरीत शनिवार दि.२३ नोव्हेंबरला समाजप्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख यांचे किर्तन
- रविवार, २४ नोव्हेंबर रोजी गझलपुष्पचा वर्धापनदिन सोहळा : रविंद्र भेगडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
- संपतराव पांडुरंग गराडे यांचे निधन
- मावळात बैलगाडा मालकाचा खून