मुलांनी संघर्ष आणि जिद्द अंगात बाळगली पाहिजे तरच यश मिळवता येते
तळेगाव दाभाडे:
“प्रतिकुल परिस्थितीशी संघर्ष करणारेच पुढे जातात.  ओंकार वर्तले यांचा पिंड सात्त्विक वृत्तीने लेखन करणाऱ्या साहित्यिकाचा असून त्यांच्या लिखाणातून साहित्य, संगीत, शिल्प या कलांची अनुभूती येते!” असा अनुभव  ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी सांगितला.
दुर्गप्रेमी ओंकार वर्तले लिखित ‘… गोष्ट यशस्वी अभिमन्यूची’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना प्रभुणे बोलत होते.
  शाळेतीलच माजी विद्यार्थी असलेल्या आणि लंडन येथे उच्च पदावर काम करीत असलेल्या नितीन कुल या मुलाची संघर्षगाथा या पुस्तकातुन मांडली आहे. प्रास्ताविकातुन नगरसेवक संतोष भेगडे यांनी मैत्रस्पर्श सोशल फाऊंडेशन (माजी विद्यार्थी संघटना) आणि संतोष भेगडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचा आढावा दिला.
   “गेली सात वर्ष या संघटना  सामाजिक बांधिलकेतुन दुर्गम भागात काम करत आहे” असे सांगितले. पुस्तकाचा नायक असलेल्या नितीन यांनी ” मुलांनी संघर्ष आणि जिद्द अंगात बाळगली पाहिजे तरच यश मिळवता येते ” असे सांगितले. पुस्तकाचे लेखक श्री ओंकार वर्तले यांना त्यांच्या दहाव्या पुस्तकाच्यापुर्ती निमित्त मावळ साहित्य रत्न पुरस्कार आणि मानपत्र देऊन सन्मानित करणेत आले.
    मानपत्राचे शब्दांकन श्री.विकास कंद सर यांनी केले व  वाचन वैषाली कोयते यांनी केले. मनोगतातुन वर्तले यांनी लेखनाचा प्रवास मांडला. ॲड पु.वा.परांजपे विद्या मंदिर आणि संतोष भेगडे स्पोर्टस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा आयोजित करणेत आला.
    या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ व्याख्याते राजेंद्र घावटे यांनी, ” साहित्य हे समाजाला दिशा देणारे असायला हवे तसेच वर्तले यांच्या लेखणीतुन याचा अनुभव वाचकांना मिळत असतो. ” असे मत व्यक्त केले.  सहकारभूषण बबनराव भेगडे  यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की ” जो संघर्ष करतो तोच यशस्वी होतो” असे म्हणुन शुभेच्छा दिल्या.
    महावितरणचे मुख्य अभियंता श्री राजेंद्र पवार हे म्हणाले कि, “लिहिणे हि एक कला आहे. यासाठी खुप तयारी करावी लागते. हे येर्‍या गबाळ्याचे काम नव्हे.” अध्यक्षीय भाषणातुन सुरेश साखवळकर यांनी सांगितले कि, “प्रत्येक व्यक्तीने कोणती तरी कला  आत्मसात करावी आणि कर्तृत्वाने किर्ती मिळवावी.” याप्रसंगी पं.किरण परळीकर,पांडुरंग पोटे, आदी शिक्षकवृंद उपस्थित होते.
याप्रसंगी यशस्वी मित्र असलेले गजानन घबाडे, अभय व्यास, तुषार खेरडे,सुनिल दाभाडे, विनित जोशी, शंकर वाजे , पवन फापाळे, राजेश होणावळे, दिपक चव्हाण, आदींचा सन्मान करणेत आला.
कार्यक्रम यशस्वी करणेसाठी गजानन घबाडे, अभय व्यास, तुषार खेरडे, पवण फापाळे, रुपेश गरुड, शंकर वाजे, सुनिल दाभाडे, आदिंनी परिश्रम घेतले.
विनया केसकर यांनी सूत्रसंचालन आणि तुषार खेरडे यांनी आभार मानले.

error: Content is protected !!