बेबडओहळ:
वसुबारस निमित्त मावळ तालुक्यातील सुप्रसिध्द ढमाले डेअरी यांनी वसुबारसचे औचीत्य साधून सर्व शेतकरी दूध उत्पादकांचा सन्मान केला. गोदरेज अग्रोव्हेटचे डॉ. रामदास ननवरे यांनी दूध उत्पादकांना मार्गद्शन केले. तळेगाव दाभाडे येथील तळेगाव जनरल हॉस्पिटल अ‍ॅण्ड कॉन्व्हलसन्ट होम नियामक मंडळाच्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल
गणेशजी खांडगे यांचा सत्कार करण्यात आला.
खांडगे यांनी सर्व दूध उत्पादकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष  हरिश्चंद्र गडशींग यांनी नवीन  तंत्रज्ञानाची जोड देऊन दूध व्यवसाय कसा फायदेशीर करावा याबाबत ची माहिती दिली.
या कार्यक्रमाची सुरुवात गोवत्स पूजन करून केली.चांदखेडच्या नवनिर्वाचित सरपंच  मिना दत्तात्रय माळी व सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार करण्यात आला. सौ. रेश्माताई फडतरे यांचाही यावेळी गौरव करण्यात आल्. दादासाहेब शशिकांत हळदे  राजेश गाडे पाटील, विलास काळोखे ,संजय मेहता, डॉ. शाळीग्राम भंडारी,आप्पासाहेब ढमाले उपस्थित होते
उत्कृष्ट दूध उत्पादक पुरस्काराकार्थी  राहुल घारे,अशोक घारे, उत्तम धामणकर, अवधूत पारखी, काशिनाथ टेमघरे,देवदास सुतार, पद्माकर कारके,जावेद मुलाणी, बाळु येवले, प्रदीप लोहोर यांचा गौरव करण्यात आला.
ढमाले डेअरी चे व्यवस्थापक मनोज ढमाले यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन रेश्मा फडतरे व कार्यक्रमाचे आभार प्रशांत दळवी यांनी मानले.

error: Content is protected !!