
महिला सन्मान पुरस्काराचे वितरण
तळेगाव दाभाडे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त धामणे ग्रामपंचायतीत अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देण्यात आले.गावातील आठ कर्तबगार महिलांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आले. ग्रामपंचायत क्षेत्रातील कर्तबगार महिलांना सरपंच,उपसरपंच ,सर्व सदस्य ,गावातील प्रतिष्ठित मान्यवर यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले.
वैजयंती कैलास गराडे ,स्वीटी सतीश गायकवाड ,प्रियांका गणेश गराडे ,अर्चना सतीश गराडे ,मंगल सुनिल आढाव ,हेमलता प्रकाश गायकवाड ,सारिका रवि मंजाळ ,वनिता खुले पुरस्काराच्या मानकरी ठरल्या.
यावेळी सरपंच अविनाश मनोहर गराडे ,उपसरपंच रेखा संदीप लोहोर, ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य अविनाश धोंडीबा दराडे , ग्रामपंचायत सदस्य प्रदीप आनंदा गराडे , ग्रामपंचायत सदस्य सोमेश पाटील गराडे ,राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या मावळ तालुकाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य दीपाली संदीप गराडे , ग्रामपंचायत सदस्य सारिका विलास गराडे , ग्रामपंचायत सदस्य अश्विनी विकास गराडे , ग्रामपंचायत सदस्य अँड अंजना मधुकर आढाळगे , ग्रामपंचायत अधिकारी विराज पवार , ग्राम महसूल अधिकारी विवेक अवचरे , ग्रामपंचायत कर्मचारी नंदकुमार गराडे , पप्पू गराडे , संगणक परिचालक वैजयंती गराडे उपस्थितीत होते.
- पायी दिंडी साठी पन्नास हजार रुपये अनुदानाची मागणी
- ‘ मित्रत्व जीवनगंगेचे ‘ बलस्थान – राजन लाखे
- सुनियोजित विकासासाठी प्रशासन कटिबद्ध – आयुक्त शेखर सिंह
- मामासाहेब खांडगे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त उद्या वडगावात ध्वजारोहण
