
तळेगाव दाभाडे: येथील
मामासाहेब खांडगे इंग्लिश मिडीयम स्कूल(सी.बी.एस.ई ) मध्ये उन्हाळी सुट्टीनंतर ९ जून २०२५-२६ शाळेच्या पहिल्या दिवशी अतिशय उत्साहात विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यामध्ये नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पेन्सिल व चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री गणेश खांडगे सरांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विशेषतः पूर्व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांसाठी फुगे लावून सजावट, तसेच फुलांच्या रांगोळ्या, व ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे औक्षण करून करण्यात आले. अशा कार्टून च्या प्रतिकृती, डान्स, म्युजिक इ. रचना करण्यात आली होती. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
अनेक बालकांचे ‘पहिले पाऊल’ (First Day of School) औपचारिक शिक्षण प्रवाहात पडणार आहे. हे पाऊल जितके दमदार, आनंदी, उत्साही आणि कृतीयुक्त पडेल तितकी शालेय शिक्षणाची अभिरूची वृद्धींगत होणार आहे. पालकवर्गही मोठ्या संख्येने आपल्या पाल्याला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होता.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका, शाळाप्रशासन, व शिक्षकवृंद यांनी सहकार्य केले.
- कामशेतमध्ये २७ जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन
- तळेगाव-ठाकरवाडी-सोमाटणे फाटा रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य; नागरिक भयभीत
- सनदी लेखापाल परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहम् सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने संपन्न
- सिंहगड एक्सप्रेसला तळेगाव स्थानकावर थांबा द्यावा : पुणे प्रवासी संघाची मुंबई उच्च न्यायालयात याचिका
- नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये प्राध्यापक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न- जनरेटिव्ह एआय, मल्टी एजंट तंत्रज्ञानावर आधारित पाच दिवसीय प्रशिक्षणास उत्स्फूर्त प्रतिसाद

