
ओलांडताना कान्हेत फळ विक्रेत्याचा अपघातात मृत्यू
कष्टकऱ्यांच्या मृत्यूने मावळात हळहळ
वडगाव मावळ : पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना कान्हे ता. मावळ येथे फळ विक्रेत्याचा अपघातात मृत्यू झाला. हातावर पोट असणाऱ्या या कष्टकऱ्यांच्या मृत्यूने मावळात हळहळ व्यक्त होत आहे. अशोक गणपत लालगुडे वय ५१ वर्षे रा. इकोव्हॅली सोसायटी कान्हे ता मावळ असे त्यांचे नाव आहे. संदीप चंद्रकांत सातकर यांनी या बाबत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
वडगाव मावळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ” रविवार ता. १ जूनला दुपारी एक वाजण्याच्या सुमारास लालगुडे महामार्ग ओलांडताना भरधाव वेगात जाणाऱ्या डंपरच्या धडक दिल्याने लालगुडे जखमी झाले. त्यांना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. असता डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी खाजगी दवाखान्यात हलविण्याचे सुचविले. तदनंतर लालगुडे यांना सोमाटणे तील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता उपचार चालू असताना लालगुडे यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले.
लालगुडे हे कान्हेतील सातकर परिवाराचे जवाई असून येथे फळे विक्री आणि माल वाहतूक टेम्पोंचा व्यवसाय होता. त्यांच्या अपघाती निधनाने लालगुडे परिवराचा आधार हरपला आहे.काही दिवसांपूर्वी त्यांच्या एका लेकीचा विवाह झाला आहे. तर समिक्षा व आरोही या दोन लेकी शिक्षण घेत आहेत.
- स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी वडगावात राष्ट्रवादीची बैठक
- मोशी येथील नवीन न्यायालयाबाबत अण्णा बनसोडे यांच्यासोबत बैठक
- नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ
- पवन मावळातील निसर्ग सौंदर्याची पर्यटकांन भुरळ
- ग्रामपंचायत कर्मचारी संघ संलग्न पुणे व सातारा श्रमिक संघाच्या जिल्हाध्यक्ष पदी गणेश वाळुंजकर : नायगाव येथील मेळाव्यात झाली निवड
