
वडगाव मावळ: मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जूना पूल कोसळून दुर्घटना घडली आहे. रविवार असल्याने पर्यटकांची गर्दी होती, अशात पूल कोसळून अनेक पर्यटक इंद्रायणीत बुडाल्याची भीती आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस, ग्रामस्थ आणि आपदा मित्र यांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. दोन दिवसांपासून मावळ परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून इंद्रायणीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. यामुळे नदीत पडलेल्या पर्यटकांना वाचविण्याचे शर्तीचे प्रयत्न यंत्रणांकडून सुरू आहे.
- कुंडमळा पूल कोसळला
- विश्वास आणि आत्मविश्वास यशस्वी वकिलीचा मूलमंत्र : न्यायमूर्ती मिलिंद जाधव
- मोशी येथील नवीन न्यायालयाबाबत अण्णा बनसोडे यांच्यासोबत बैठक
- मावळातील शाळेची जिल्हास्तरीय यशस्वी कामगिरी – पिंपळखुटे शाळेला तृतीय क्रमांकाचा सन्मान
- स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी वडगावात राष्ट्रवादीची बैठक

