
वडगाव मावळ : मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वपुर्ण बैठक सोमवार ता. १६ जून ला सकाळी ९.३० वाजता शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आमदार सुनिल शेळके व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी दिली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची महत्वपूर्ण बैठक असल्याचे खांडगे म्हणाले.
या बैठकीला मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुकाणू समिती, तालुका कार्यकारणी, सर्व सेल पदाधिकारी व कार्यकारणी , शहर व विभाग अध्यक्ष व कार्यकारणी, सर्व आजी माजी पदाधिकारी , लोकप्रतिनिधी, सहकारी संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहनही शेळके व खांडगे यांनी केले.
- कामशेतमध्ये २७ जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन
- तळेगाव-ठाकरवाडी-सोमाटणे फाटा रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य; नागरिक भयभीत
- सनदी लेखापाल परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहम् सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने संपन्न
- सिंहगड एक्सप्रेसला तळेगाव स्थानकावर थांबा द्यावा : पुणे प्रवासी संघाची मुंबई उच्च न्यायालयात याचिका
- नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये प्राध्यापक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न- जनरेटिव्ह एआय, मल्टी एजंट तंत्रज्ञानावर आधारित पाच दिवसीय प्रशिक्षणास उत्स्फूर्त प्रतिसाद

