
तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे येथील शाळा चौकातील श्री विठ्ठल मंदिर संस्थांच्या वतीने श्री गुरु दादा महाराज साखरे यांच्या ८५ व्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या गाथा पारायण सोहळा व कीर्तन महोत्सवाची सांगता रविवारी काल्याच्या कीर्तनाने संपन्न झाली.यावेळी भाविकांनी उत्स्फूर्तपणे मोठी हजेरी लावली होती.
श्री गुरु दादा महाराज साखरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विठ्ठल मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन १ जून ते ८ जून पर्यंत करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योजक प्रशांत यशवंत दाभाडे यांच्या हस्ते झाले,तर यावेळी आयोजित करण्यात आलेल्या गाथा पारायणाचे नेतृत्व ह.भ. प.नथुराम महाराज जगताप पाटील यांनी केले होते.
यावेळी श्री संत तुकाराम महाराज यांची चरित्रकथा ह. भ.प.प्रकाश महाराज शिंदे यांनी आठ दिवस कथन केली, तर या सप्ताहातील कीर्तन महोत्सवाचा समारोप ह.भ.प. डॉ.चिदंबरम महाराज साखरे यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाला.
रविवारी सकाळी पहाटे श्री विठ्ठल मंदिरामध्ये काकड आरती,भजन आणि काल्याचे कीर्तन,त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन विश्वस्त भागीरथीबाई खंडेराव गुंड यांच्या वतीने करण्यात आले होते.यावेळी विश्वस्त गणेश गुंड,अंकुश गुंड,शेखर गुंड, प्रतिभा गुंड तसेच सुमित गुंड या परिवाराच्या वतीने महापूजा करण्यात आली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन विठ्ठल मंदिर संस्थांचे विश्वस्त ह.भ.प. बाळकृष्ण महाराज आरडे, यतीनभाई शहा,प्रशांत दाभाडे,शामराव भेगडे, मुरलीधर महाराज ढेकणे, दिनेश दरेकर,अतुल काका देशपांडे,चिटणीस विलास नवाळे,सोनबा गोपाळे गुरुजी आदींनी केले होते. कार्यक्रमांना भाविकांची मोठी उपस्थिती होती.
- स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी वडगावात राष्ट्रवादीची बैठक
- मोशी येथील नवीन न्यायालयाबाबत अण्णा बनसोडे यांच्यासोबत बैठक
- नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ
- पवन मावळातील निसर्ग सौंदर्याची पर्यटकांन भुरळ
- ग्रामपंचायत कर्मचारी संघ संलग्न पुणे व सातारा श्रमिक संघाच्या जिल्हाध्यक्ष पदी गणेश वाळुंजकर : नायगाव येथील मेळाव्यात झाली निवड
