
तळेगाव दाभाडे :’ एक पेड मॉ के नाम ” या शासनाच्या उपक्रमांतर्गत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात वृक्षारोपण करून स्वच्छता अभियान राबविले.सहाय्यक निबंधक कार्यालय सहकारी संस्था, मावळ व बाजार समितीच्या वतीने हा उपक्रम झाला.
सहाय्यक निबंधक सर्जेराव कांदळकर, बाजार समितीचे उपसभापती नामदेव शेलार, संचालक दिलीप ढोरे, नथुराम वाघमारे, बंडू घोजगे, बाळासाहेब वाजे,सहकार अधिकारी मंदार कुलकर्णी , लहू ढेरंगे, मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव मंगेश घारे उपस्थित होते.

राज्यात शासनाच्या विविध विभागात या उपक्रमाव्दारे देशी वृक्षांची लागवड व संवर्धन करण्यात येणार असल्याचे कांदळकर यांनी सांगितले.यावेळी वृक्ष संवर्धनाची शपथ घेण्यात आली. दिलीप ढोरे म्हणाले,” झाडे लावणे सोपे आहे.लावलेल्या झाडांचे संगोपन करणे हेही महत्त्वाचे आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील या सगळ्या झाडांचे संगोपन होईल. टप्प्याटप्प्याने अजून झाडांची लागवड करून संगोपनाची जबाबदारी घेतली जाईल.
- आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड – एसआयटी स्थापन : गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधानसभेत घोषणा
- ‘ एक पेड मॉ के नाम ‘ मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात वृक्षारोपण
- तळेगाव जनरल हॉस्पिटल तर्फे कै. कृष्णराव भेगडे यांना श्रद्धांजली
- कै.कृष्णराव भेगडे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी शनिवारी तळेगावात शोकसभा
- ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी घेतली स्व. कृष्णराव भेगडे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट

