

वडगाव मावळ :मराठा समाजाची विवाह सोहळा आणि विवाह नंतरची आचारसंहिता स्वयंप्रेरणेने स्वीकारण्याची गरज आहे.आणि यासाठी लोकचळवळ उभी राहील अशी अपेक्षा फोल ठरू नये.महाराष्ट्राच्या प्रत्येक सामाजिक बदलांना लोकचळवळींनी मूर्तरूप दिले.याही मोठया बदलामध्ये समाज म्हणून प्रत्येक जण सहभागी होईल अशी अशा आहे.
स्वराज्याच्या निर्मितीचा अंकुर शहाजीराजे भोसले आणि जिजाऊ मॉ साहेबांनी रुजवला.आणि रयतेला सोबत घेऊन युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे केले आणि वाढविले.पारतंत्र्यात असलेल्या देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी लोकचळवळ उभी राहिली आणि स्वातंत्र्य मिळाले हा आमचा इतिहास आम्हाला चळवळींचे आणि लोकसहभागाचे म्हत्व अधोरेखित करून जातो हे नव्याने सांगण्याची गरज नाही.
सतीची चाल, मुलींना शिक्षण, अस्पृश्यता निर्मूलन अशा अनेक सामाजिक बदलात लोकचळवळ कायमच लाख मोलाची ठरली.शासनकर्त्यांनी घेतलेले प्रत्येक सभाजभिमुख व लोककल्याणकारी निर्णय चळवळीतून जनमानसात रूजले आणि त्याचे अनुकरण देखील झाले. मराठा समाजाची आचारसंहिता जनमानसात रुजवली तरच तिचे फलित दिसणार आहे. मोठया उद्दात हेतूने आशादायी अशी आचारसंहिता मराठा समाजाला तारक ठरणार आहे.
शेकडो एकर जमिनीचा मालक असलेला मराठा समाज लग्नाच्या बडेजावापायी कंगाल होत गेला आहे. याकडे दस्तुरखुद्द मराठा समाजाचे दुर्लक्ष होत गेले हे दुदैव आहे. वैष्णवीच्या मृत्यू नंतर राज्यभर शाही विवाह सोहळयाची चर्चा झाली. आणि हुंडाबंदीचा कायदा असताना हुंड्यासाठी वैष्णवीचा मृत्यू झाला ही घटना समोर आली. आजही हजारों शाही विवाह होतात, आणि कित्येक वैष्णवी सासरी पटत नाही म्हणून माहेरात राहतात.
मोठा बडेजाव करून विवाह करण्याची गरज आहे का ? याकडे स्वतः पाहण्याची आवश्यकता आहे.तर समाज काय म्हणेल म्हणून कर्ज काढून मुलामुलींची लग्न करण्याची गरज नाही असा विश्वास देणारी लोकचळवळ पाठिशी उभी राहण्याची ही वेळ आहे. केवळ प्रतिष्ठेसाठी डामडौल करावा अशी मराठा समाजाची खरच परिस्थिती आहे का ❓ हे विसरून चालणार नाही. मुलांचे शिक्षण, उद्योग, व्यवसायातील संधी यावर लक्ष केंद्रित करून मराठा समाजाने पुढे जाण्याची गरज आहे.
मराठा समाजाने विवाह सोहळयाची आचारसंहिता घातली आहे ती समाजाला तारणहार आहे. मराठा समाजातील धनाढ्य मंडळींंनी, लोकप्रतिनिधींनी,श्रीमंतांनी स्वतः पासून ही सुरूवात केली की मध्यमवर्गीय माणूस त्यांचे अनुकरण करील हे वेगळे सांगायची गरज नाही. त्यामुळे वधू आणि वर पिता यांचे आर्थिक विवेचना कमी होईल. मुला मुलींच्या लग्नाच्या खर्चाची चिंता मिटेल. परिणामी आरोग्य, शिक्षण, उद्योग, व्यापार, व्यवसायात प्रगतीची नवी दालने आपसुक उभी राहील.
- स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी वडगावात राष्ट्रवादीची बैठक
- मोशी येथील नवीन न्यायालयाबाबत अण्णा बनसोडे यांच्यासोबत बैठक
- नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ
- पवन मावळातील निसर्ग सौंदर्याची पर्यटकांन भुरळ
- ग्रामपंचायत कर्मचारी संघ संलग्न पुणे व सातारा श्रमिक संघाच्या जिल्हाध्यक्ष पदी गणेश वाळुंजकर : नायगाव येथील मेळाव्यात झाली निवड
