
ग्रामपंचायत कर्मचारी संघ संलग्न पुणे व सातारा श्रमिक संघाच्या जिल्हाध्यक्ष पदी गणेश वाळुंजकर
नायगाव येथील मेळाव्यात झाली निवड
वडगाव मावळ: मावळ तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गणेश एकनाथ वाळुंजकर यांची महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघ संलग्न पुणे व सातारा श्रमिक संघाच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड झाली.पुणे व सातारा जिल्हा श्रमिक संघाचा मेळावा व नवीन कार्यकारिणी निवड सभा मावळात झाली.
आमदार सुनिल शेळके,राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष गणेश ढोरे, कृषी व पशुसंवर्धनचे माजी सभापती बाबूराव वायकर, पुणे व सातारा श्रमिक संघ संलग्न महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस कॉम्रेड ज्ञानोबा घोणे, पुणे व सातारा जिल्हा श्रमिक संघ संलग्न महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष अशोक गायकवाड,उपाध्यक्ष वसंतराव शिंदे ,संतोष तुपे विभागीय अध्यक्ष ,सुभाषजी तुळवे विभागीय अध्यक्ष, प्रसिद्धी प्रमुख राहुल तावरे, मुळशी तालुका अध्यक्ष संतोष साखरे,वेल्हा तालुका अध्यक्ष प्रकाश गायकवाड ,हवेली तालुका अध्यक्ष अविनाश मेमाणे ,इंदापूर तालुका अध्यक्ष श्रीहरी दरडे, जुन्नर तालुका अध्यक्ष शंकरराव रसाळ ,शिरूर तालुका अध्यक्ष नवनाथ डाळिंबकर ,भोर तालुकाध्यक्ष भरत कुंमकर ,खेड तालुका अध्यक्ष यशवंत धंधरे,बारामती तालुकाध्यक्ष पिंटूची सावंत,दौंड तालुका अध्यक्ष मारुती यादव ,पुरंदर तालुका अध्यक्ष मनोहर बारभाई ,भारतीय मजदूर संघ आय आर बी कंपनी कामगार संघटनेचे अध्यक्ष सतीश वाळुंजकर ,पवना धरणग्रस्त नेते प्रकाश शिंदे,पुणे जिल्ह्यातील सर्व आजी माजी अध्यक्ष उपाध्यक्ष व पदाधिकारी मेळावळ्यास होते.
जिल्हा कार्यकारणी द्वय वार्षिक निवड कार्यक्रम सुरू करण्यात आला त्यामध्ये संघाचे सरचिटणीस कॉम्रेड कॉम्रेड ज्ञानोबा घोणे यांनी सभेचे कामकाज सुरू केले. सर्व तालुक्यातील पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडीबाबत आपापले मत मांडण्यास सांगितले.
सर्व तालुक्याचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी मनोगत व्यक्त करून मावळ तालुक्याचे अध्यक्ष गणेश वाळुंजकर यांना जिल्हाध्यक्ष पद देण्यात यावी असे एकमताने ठरविण्यात आले. घोणे यांनी वाळुंजकर यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर केले.
आमदार सुनिल शेळके म्हणाले , “राज्यामधील जेवढे ग्रामपंचायत कर्मचारी बंधू आणि भगिनी आहेत.त्यांच्या मागण्या व प्रश्न सोडवण्यासाठी मी पावसाळी अधिवेशनामध्ये सभागृहात आवाज उठवणार आहे तसेच नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष गणेश एकनाथ वाळुंजकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पुणे जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती बाबुराव वायकर वायकर म्हणाले,बआता जरी जिल्हा परिषदे मध्ये प्रशासक काम करीत असेल तरी आम्ही वैयक्तिक लक्ष टाकून जिल्हा परिषदेत संदर्भात ज्या कर्मचाऱ्यांच्या आणि अडचणी व मागण्या आहेत त्या आम्ही प्रामुख्याने सोडवण्याचा प्रयत्न करू.
जीवन गायकवाड उपाध्यक्ष मावळ तालुका ,ग्रामपंचायत कर्मचारी संघटना राजेंद्र कांबळे ,जेष्ठ सल्लागार सहादू पोटफोड कार्याध्यक्ष, सुखदेव गोपाळे ,सरचिटणीस भाऊसाहेब कल्हाटकर ,सह कार्याध्यक्ष बाळासाहेब घाडगे ,सचिव सुशील वाडेकर ,वसुदेव तनपुरे ,माऊली काळे,भाऊ थोपटे ,पोपट गायकवाड,साधना धामणकर ,उषा ओझरकर सुप्रिया घारे ,जयश्री शिवेकर उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जीवन गायकवाड ,सहादू पोटफोडे ,संदीप तिकोणे यांनी केले.नवनिर्वाचित अध्यक्ष गणेश वाळुंजकर यांनी आभार मानले.
गणेश वाळुंजकर म्हणाले, ” मला दिलेली संधी मी सार्थ ठरविन. कर्मचाऱ्यांच्या ज्या काही प्रलंबित मागण्या आहेत .त्या शासनाकडे व संबंधित ग्रामविकास खाते व जिल्हा परिषद पुणे येथे जाऊन कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविल.
- मावळातील शाळेची जिल्हास्तरीय यशस्वी कामगिरी – पिंपळखुटे शाळेला तृतीय क्रमांकाचा सन्मान
- स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी वडगावात राष्ट्रवादीची बैठक
- मोशी येथील नवीन न्यायालयाबाबत अण्णा बनसोडे यांच्यासोबत बैठक
- नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ
- पवन मावळातील निसर्ग सौंदर्याची पर्यटकांन भुरळ

